शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
3
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
4
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
5
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
6
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
7
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
8
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
9
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
10
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
11
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
12
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
13
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
14
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
15
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
16
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
17
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
18
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
19
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
20
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट

रेल्वेस्थानकावर प्रवाशाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:15 AM

नाशिकरोड रेल्वेस्थानकावर उतरलेल्या युवक प्रवाशास रिक्षात बसवून मारहाण करण्यात आली. तसेच चाकूने वार करून जबरी लूट केल्याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकावर उतरलेल्या युवक प्रवाशास रिक्षात बसवून मारहाण करण्यात आली. तसेच चाकूने वार करून जबरी लूट केल्याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, एकजण फरार आहे. उत्तर प्रदेशमधील सेरगुंवा मेहदपूर येथील व सध्या समृद्धी हायवे साइटरोडवर वावी, सिन्नर येथे राहणारा युवक राजकुमार सिंग अभिराज सिंग (२७) हा रेल्वेने नाशिकरोड रेल्वेस्थानकावर उतरला. रेल्वेस्थानकातून सिन्नर-वावी येथे जाण्यासाठी आंबेडकर रोडवरून  शिवाजी पुतळ्याकडे रस्त्याने पायी  जात असताना रिक्षाचालक व पाठीमागे बसलेल्या दोघा युवकांनी  राजकुमार सिंग याला अडवले. तसेच रिक्षाचालक व त्याच्या दोन साथीदारांनी दमदाटी करत राजकुमार सिंग  याला रिक्षात बसवून भाजीपाला मार्केट येथे अंधारात नेऊन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत खांद्यावर  चाकूने वार करून जखमी केले.तिघा संशयितांनी राजकुमार सिंगयाच्या खिशातील १३ हजार रुपयांचा मोबाइल व पाच हजार ७००रुपयांची रोकड काढून घेऊन तेथून पोबारा केला. सोमवारपर्यंत पोलीस कोठडीलुटमारीच्या घटनेत राजकुमार सिंग याने एमएच १५ व शेवटचे दोन क्रमांक ६१ अशी रिक्षा असल्याची पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तपासचक्रे फिरवून संशयित रिक्षाचालक सागर संतोष सूर्यवंशी (२८) रा. चंपानगरी जेलरोड, आशुतोष अनिल शेलार (२४) रा. अरिंगळे मळा यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रिक्षा जप्त केली आहे. दोघा संशयितांना न्यायालयासमोर उभे केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यांचा तिसरा साथीदार अद्याप फरार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcentral railwayमध्य रेल्वे