सटाणा:एकविसावे शतक महिलांचे असून विविध क्षेत्रात पुरु षांच्या बरोबरीने कार्यकर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महिलांना स्वावलंबी होण्यासाठी समाजानेही पुढाकार घेण्याची गरज आहे.नगर परिषदेने याच कर्तव्यभावनेतून गेल्या दोन वर्षात चारशेहून अधिक महिलांना प्रशिक्षित करून स्वत:च्या पायावर उभे केले आहे असे प्रतिपादन नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी केले. सटाणा नगर परिषदेतर्फे महिलांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या बुधवारी(दि.22)झालेल्या उदघाट्न कार्यक्र मप्रसंगी नगराध्यक्ष मोरे बोलत होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महिला प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.शासकीय योजनेतून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी गेल्या तीन वर्षात चारशेपेक्षा अधिक महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले आहे.यावर्षी ६० महिलांना ब्युटीपार्लरचे तर६० महिलांना शिवणकाम प्रशिक्षण देण्यात येत आहे.महिला व्यावसायिकदृष्ट्या प्रशिक्षित झाल्यानंतर त्यांनी स्वत:चे उद्योग व्यवसाय सुरू केले आहेत.त्यातून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या असून कुटुंबासाठीही भरभक्कम आधार निर्माण झाला आहे.चालू वर्षी महिलांना प्रशिक्षित केल्यानंतर व्यवसायाच्या उपयोगासाठी आवश्यक साहित्याच्या किटचेही नगर परिषदेकडून वाटप करण्यात येईल.तसेच उत्कृष्ट शिवणकाम करणाº्या महिलांना शिलाई मशीनही देण्याचे आश्वासनही नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिले.यावेळी उपनगराध्यक्ष सोनाली बैताडे, महिला बालकल्याण समिती सभापती शमा मन्सूरी,पाणीपुरवठा सभापती संगीता देवरे,नगरसेविका भारती सूर्यवंशी,पुष्पाताई सूर्यवंशी,सुनिता मोरकर,सुरेखा बच्छाव,रूपाली सोनवणे,शमीम मुल्ला,मुख्याधिकारी हेमलता डगळे,सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजय भोई, समूह संघटक अजय पवार आदींसह अधिकारी व महिला उपस्थित होत्या.
महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 4:20 PM
सटाणा:एकविसावे शतक महिलांचे असून विविध क्षेत्रात पुरु षांच्या बरोबरीने कार्यकर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महिलांना स्वावलंबी होण्यासाठी समाजानेही पुढाकार घेण्याची गरज आहे.नगर परिषदेने याच कर्तव्यभावनेतून गेल्या दोन वर्षात चारशेहून अधिक महिलांना प्रशिक्षित करून स्वत:च्या पायावर उभे केले आहे असे प्रतिपादन नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी केले. सटाणा नगर परिषदेतर्फे महिलांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या बुधवारी(दि.22)झालेल्या उदघाट्न कार्यक्र मप्रसंगी नगराध्यक्ष मोरे बोलत होते.
ठळक मुद्देसटाणा नगर परिषदेतर्फे महिला वर्गासाठी प्राधान्यक्र माने विविध उपाययोजनांची अंमलबजावणी होत आहे.नगर परिषदेच्या इतिहासात कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांशी संबंधित विविध उपक्र मांचे आयोजन होत आहे.