येवला : नटश्रेष्ठ निळू फुले अभिनय करंडकसाठी स्पर्धा तीव्र झाली असून ६ जानेवारी २०१९ रोजी महात्मा फुले नाट्यगृहात अंतिम सामना होणार आहे. यासाठी निवडलेल्या स्पर्धकांना दोनदिवसीय विशेष प्रशिक्षण देणात येणार आहे.साहित्य परिषद शाखा येवला आणि महात्मा फुले अकादमी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या येवला तालुक्यातील अठरा पंचायत समिती केंद्रांतील अभिनय स्पर्धेमध्ये प्रथम, व्दितीय, तृतीयक्र मांकाच्या स्पर्धकांचे प्रशिक्षण स्वामी मुक्तानंद विद्यालय येवला येथील सभागृहात घेण्यात आले.या समारंभाचे उद्घाटन दीपक गायकवाड यांनी केले. अध्यक्षपदी सूर्यकांत सस्कर होते. या प्रशिक्षण शिबिरात प्रा. शिवाजी भालेराव, लक्ष्मण बारहाते, बाळासाहेब सोमासे, विक्रम गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणानंतर घेण्यात आलेल्या नटश्रेष्ठ निळू फुले अभिनय करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीकरता प्राथमिक गटातील १० स्पर्धकांनी तर माध्यमिक-उच्च माध्यमिक गटातील ९ स्पर्धकांनी बाजी मारली आहे.या स्पर्धेत स्पर्धक विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करावी म्हणून या स्पर्धकांना अंतिम स्पर्धेपूर्वी दि.२४आणि २५ डिसेंबर रोजी कला व वाणिज्य महाविद्यालय येवला येथे नाट्य अभिनयाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याकरिता नाशिक येथून प्रशिक्षक नूपुर सावजीआणि नीरज करंदीकर उपस्थित राहणार आहेत.अंतिम स्पर्धेसाठी पात्र स्पर्धकछोटा गट - तनुजा नवनाथ कदम, गायत्री विश्वनाथ कदम, आंचल नाना बोंबले, अर्जुन संतोष वाघ, शिवानी मच्छिंद्र गिडगे, आदिती प्रकाश कदम, राकेश संजय घोडेराव, प्रणाली बापूसाहेब वाघ, कृष्ण निवृत्ती गाढे, साक्षी शांताराम कदममोठा गट - ओमकार नंदू दाणे, भारती बाळासाहेब सौंदाणे, संकेत गोकुळ सोनावणे, मुस्कान अन्सार शेख, प्रद्युम्न दादासाहेब जाधव, पवन जनार्धन चव्हाणगीर, रिसका संतोष चव्हाण, प्रियांका श्रीराम नवले, प्रवीण शेलारदि. २४ तारखेला सकाळी साडेदहा वाजेपर्यंत उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अभिनय स्पर्धेसाठी निवडलेल्या स्पर्धकांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:49 PM