पेठ : आदिवासी विकास विभाग व पंचायत समिती पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने पेसा कायद्यातंर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांना पेसा कायद्यातील अबंधनिधी योजनांचे प्रशिक्षण देणत आले़पेठ येथे झालेल्या प्रशिक्षण वर्गाचे जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले़ यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी शांता तांबे, विस्तार अधिकारी बी़ एस़ पवार, पाडवी उपस्थित होते़यावेळी भास्कर गावित यांनी पेठ हा संपूर्ण आदिवासी तालुका असल्याने पेसा अंतर्गत येणाऱ्या निधीचे सर्व ग्रामपंचायतींनी नियोजन करून गावच्या विकासासाठी विनियोग करावा असे आवाहन केले़ पेसा कायद्याचा अभ्यास करून त्यातील तरतुदीनुसार योजनांची आखणी करण्याचेही त्यांनी सांगितले़ यावेळी तालुक्यातील बाडगी, धोंडमाळ, वांगणी, कुभाळे, राजबारी, कायरे, जांभूळमाळ, एकदरे, उस्थळे, कोटंबी आदि ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांना तीन दिवसाचे प्रशिक्षण आदिवासी विकास विभागाच्या वतीने देण्यात आले़ याप्रसंगी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष बी़ आऱ खंबाईत, पी़ ए़ पाटील, यांच्यासह सरपंच, ग्रामसेवक, वनहक्क समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते़ (वार्ताहर)
पेसा कायद्याचे ग्रामपंचायतींना प्रशिक्षण
By admin | Published: January 10, 2016 10:51 PM