घोटी : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीसपाटील संघटनेच्या उपशाखा इगतपुरी तालुक्याच्या वतीने पोलीसपाटील यांना प्रशिक्षण देण्यात आले. अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चिंतामण मोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष अरुण बोडके, संपत जाधव, सचिव अरुण महाले, इगतपुरीचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, वाडीवºहेचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव, घोटीचे पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, महिला संघटक सुनीता बोडके, दिंडोरी तालुकाध्यक्ष सोमनाथ मुळाणे, बबनराव बेंडकुळे, अनिल गडाख, मुकेश कापडी, सोमनाथ बेझेकर, संजय चव्हाण, ज्ञानेश्वर मेढे उपस्थित होते.तालुका संघटनेच्या वतीने माजी पोलीस पाटील नथू कुटके, किसन धांडे, कचरू वाकचौरे, शिवाजी आवारी, सुभाष देशमुख यांचा सत्कार करण्यात आला, तर दिवंगत पोलीसपाटील भिवाजी जाधव, एकनाथ तोकडे, पांडुरंग भोर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.प्रमुख पाहुण्यांचा तालुकाध्यक्ष मच्छिंद्र खातळे, सचिव कैलास फोकणे, संघटक ज्ञानेश्वर धोंगडे, शैला नाठे, मीना बºहे, ललिता शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संघटनेचे सचिव कैलास फोकणे, विजय कर्डक यांनी सूत्रसंचालन केले.
इगतपुरीतील पोलीसपाटलांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 11:33 PM