मुखेड : मका व कापूस पिकावर योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य औषधांची फवारणी केल्यास लष्करी अळी व बोंड अळी नियंत्रण करता येणे शक्य आहे. असे प्रतिपादन पाटोदा कृषी मंडळ अधिकारी जे.आर. क्षीरसागर यांनी मुखेड येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागच्या वतीने आयोजित शेतकरी प्रशिक्षण वर्गात केले.कापूस पिक डिसेंबर नंतर काढून टाकावे. परहाठीतील सुप्तावस्था असतात म्हणून शेतात किंवा शेताजवल पराहठी रचून ठेवु नये.कपाशीचे फरदड (दुरी) घेऊ नये. शेतातील पिकांचे अवशेष वेचून नष्ट करावेत. व शेत स्वच्छ ठेवावे. रोटाव्हेटर किंवा चुरा करणारे यंत्र वापरावे. असे हि क्षिरसागर यांनी सांगितले. कृषी पर्यवेक्षक बी के नाईकवाडे यांनी प्रशिक्षण वर्गात दुष्काळी परिस्थितीत फळबागा वाचिवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व जनावरांचे चारा व्यवस्थापन व आच्छादन, मडका सिंचन, सलाइनचा वापर, छाटणी करणे, विरळणी करणे, बोर्डोपेस्ट, केविलीन, पोटॅशियम नायट्रेट, थायो युरिया फवारणी करणे. ठिबक सिंचनाचा वापर करणे. मका पिकावरील लष्करी अळी नियंत्रणासाठी विषारी आमिशाचा वापर करावा.यासाठी १० की.ग्राम. साळी चा भुसा २ की. ग्राम.गुळ २ते ३ लिटर पाण्यात मिसळून २४ तास पाण्यात सडण्यासाठी ठेवावे. वापर करावयाच्या अर्धा तास अगोदर त्यामधे थायोडीकारब ७५डब्ल्यू. जी. १०० मिली. ग्रॅम मिसळावे. व हे विषारी आमिष पोंग्यात टाकावेत.पिक 30 दिवसाचे असल्यास बारीक वाळू व चुना ९:१ या प्रमाणात मिसळुन पोंग्यात टाकावेत. तसेच मका पिकाचे लष्करी अळीपासून संरक्षण करण्यासाठी जैविक व रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. याबाबत चे सविस्तर मार्गदर्शन केले. या शेतकरी प्रशिक्षनासाठी मुखेड परिसरातील शेतकरी मोठया संखेने उपस्थित होते. आभार श्रीमती. कुर्हाडे यांनी आभार मानले.
शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 7:02 PM