त्र्यंबकेश्वर : दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या पूर्वसंध्येला व रविवारच्या सुटीमुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती.मंदिर परिसरामध्ये सर्वत्र बॅरीकेटच्या सहाय्याने बंदोबस्त करण्यात आला होता. केवळ देणगी दर्शनाची पावती घेऊनच या रांगेने जाता येत होते.मोफत दर्शन रांगेतही मोठी गर्दी होती. खासगी वाहनांचीमोठी संख्या होती. ही वाहने ठिकठिकाणी रस्त्यावर उभी केलेली दिसत होती.कुशावर्त तीर्थ, निवृत्तीनाथ मंदीर, गंगाद्वार, ब्रम्हगिरी, श्रीगजानन महाराज मंदीर ,श्रीस्वामी समर्थ गुरु कूल आदी ठिकाणेही भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहात होती. विशेष म्हणजे पाऊस देखील श्रावणासारखा होता.मंदिर आवारात भाविकांसाठी शामियानात्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मंदीरात जाण्यासाठी रांगेचे नियोजन केले आहे. भला मोठा शामियाना टाकण्यात आला असून त्यात बसायची सोय, टॉयलेट आदी सोयी आहेत. निसर्गप्रेमींनी देखील पहिने, दुगारवाडी, अंबोली परिसरात गर्दी केली होती. दुस-या श्रावणी सोमवारी ईदची सुटी आल्याने मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे.
त्र्यंबकला वीकेण्डमुळे भाविकांची गर्दी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 1:22 AM
दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या पूर्वसंध्येला व रविवारच्या सुटीमुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती.
ठळक मुद्देपर्यटनाचाही आनंद : सलग सुट्यांमुळे वाढली वर्दळ