नाशिक : त्र्यंबकेश्वर रोडवरील खंबाळे शिवारातील हॉटेल दी बॉसवर ग्रामीण पोलिसांनी शनिवारी (दि़९) छापा टाकून अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश केला़ याप्रकरणी अनैतिक व्यवसाय चालविणाºया दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, तीन मुलींची सुटका करण्यात आली आहे़ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी अवैध धंद्यांवर छापेमारी करून ते बंद करण्याचे आदेश दिले होते़ त्रंबकेश्वर परिसरातील हॉटेलांत अवैधरीत्या सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाबाबत दराडे यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, ग्रामीण पोलिसांचे विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या पथकाने शनिवारी (दि़९) नशिक- त्र्यंबकेश्वर रोडवरील खंबाळे शिवारातील हॉटेल दी बॉस येथे छापा टाकला.या हॉटेलमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संशयित रवि काशीनाथ शिंदे (३६, रा. कामगारनगर, सातपूर) व राजीव रामदास पाटील (४१, रा. शिंदे, ता. जि. नाशिक) या दोघांना अटक करून तीन मुलींची सुटका केली़ याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याबरोबरच ग्रामीण पोलिसांनी त्र्यंबकेश्वरमध्ये सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाºया टवाळखोर व महाविद्यालयीन २३ तरुण व २३ तरुणींवर कारवाई केली़ दरम्यान, पोलिसांची ही छापेमारी सुरूच राहणार आहे़
पोलीस निरीक्षक कंट्रोललात्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेल्या अनैतिक व्यवसाय व अवैध धंद्यांबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांना जबाबदार धरण्यात आले आहे़ पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी मांडवकर यांची तडकाफडकी ग्रामीण पोलीस मुख्यालयातील कंट्रोल रूममध्ये बदली केली आहे़ यापूर्वी तीन पोलीस निरीक्षकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे़