शहरं
Join us  
Trending Stories
1
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
2
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
3
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
4
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
5
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
6
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
7
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
8
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
9
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
10
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
11
महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात
12
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
13
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
14
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
15
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
16
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
17
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
18
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
19
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
20
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला

पाणीपुरवठा योजनेचे हस्तांतरण

By admin | Published: January 05, 2017 1:28 AM

बैठक : समिती अध्यक्षपदी घुमरे; उपाध्यक्षपदी सैंद्रे

सिन्नर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची वडांगळीसह १४ गाव पाणीपुरवठा योजना समितीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय पंचायत समितीत पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. या समितीच्या अध्यक्षपदी सांगवी येथील विनायक हौशिराम घुमरे, तर उपाध्यक्षपदी नवनाथ गयाजी सैंद्रे यांची निवड करण्यात आली.गटविकास अधिकारी रत्नागर पगार यांच्या अध्यक्षतेखाली व मजीप्राचे उपअभियंता एस.डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत योजनेत समाविष्ट असलेल्या १४ गावांतील सदस्यांसोबत बैठक पार पडली. पंचायत समिती सभापती संगीता काटे, उपसभापती राजेंद्र घुमरे, जिल्हा परिषद सदस्य ताईबाई गायकवाड, राजेश नवाळे, पंचायत समिती सदस्य रामदास खुळे, अलका मुरडनर, मजीप्राचे शाखा अभियंता आर.एच. मिस्त्री व्यासपीठावर उपस्थित होते. सुमारे वर्षभरापूर्वी पाणीयोजनेचे काम पूर्ण झाले असून, यापुढे योजनेची देखभाल व दुरुस्तीचे काम समितीकडे असणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी रत्नागर पगार यांनी दिली. पगार यांनी समिती सदस्यांनी योजनेसंबंधी व कर्तव्याची जाणीव करून दिली. या सदस्यांमधून अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षपदी सांगवी येथील विनायक घुमरे, तर उपाध्यक्षपदी नवनाथ सैंद्रे यांची निवड करण्याचा निर्णय सदस्यांनी घेतला. समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)