नाशिक : नाशिक जिल्हा कार्यरत असलेल्या वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ या संवर्गातील सुमारे ११७ वैद्यकीय अधिकाºयांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील सेवाज्येष्ठता यादी जाहीर करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाच ठिकाणी अनेक वर्ष काम करणाºया वैद्यकीय अधिकाºयांच्या प्रस्तावित असलेल्या बदल्यांना अखेर हिरवा कंदील मिळाला आहे.जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाºयांच्या बदल्यांची सेवाज्येष्ठता यादी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समितीने जाहीर केली आहे. यापूर्वी शासनाच्या आरोग्य विभागाकडून वैद्यकीय अकिाºयांच्या बदल्या करण्यात येतहोत्या. मात्र शासनाच्या निर्णयानुसार २०१७ पासून वैद्यकीय अधिकाºयांच्या बदलीचे अधिकार जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून केल्या जातात. त्यानुसार या समितीने जिल्ह्णातील ११७ वैद्यकीय अधिकाºयांच्या बदलीला हिरवा कंदील दिला आहे. या यादीनुसार जिल्ह्णातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या वैैद्यकीय अधिकाºयांच्या जिल्ह्णांतर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहेत.जिल्हा अंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्टÑ वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ (वेतन बॅन्ड १५६००-३९१०० ग्रेड पे ५४००) या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांच्या सन २०१८ या वर्षात नाशिक जिल्हा अंतर्गत जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत सर्वसाधारण बदल्या करण्यात आलेल्या आहेत. सदर वैद्यकीय अधिकाºयांची वास्तव सेवाज्येष्ठता यादी जिल्हा परिषदेने यापूर्वीच संकेतस्थळावर प्रसारित केली आहे. त्याप्रमाणे सर्व तालुका कार्यालयात यासंदर्भात मेल करण्यात आलेला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समितीने जाहीर केलेल्या यादीसंदर्भात आक्षेप नोंदविण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली होती. त्यानुसार यासंदर्भात केवळ एकच तक्रार आजपर्यंत प्राप्त झाली असून, ३१ तारखेपर्यंत हरकत नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासंदर्भात कुणाचीही हरकत असल्यास त्यांनी योग्य त्या पुराव्यासह हरतकत, दुरुस्ती सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बदलीचे विकल्प विहित नमुन्यात सादर करण्याबाबतचेदेखील आदेश देण्यात आलेले आहेत. संबंधित वैद्यकीय अधिकाºयांनी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन सर्व संबंधित वैद्यकीय अधिकाºयांनी या उपक्रमाकडे लक्ष देण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिल्या आहेत.—इन्फो—बदल्यांबाबतचे निकषशासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाºयांच्य अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या या बदल्या सेवाज्येष्ठतानुसार करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त एकाच ठिकाणी १० वर्ष सेवा बजावणाºया डॉक्टरांचा सामावेश आहे तर दोन वर्ष ते तीन वर्ष सेवा केलेल्या डॉक्टरांचादेखील यामध्ये समावेश आहे बदल्यांबाबतचे निकषशासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाºयांच्य अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या या बदल्या सेवाज्येष्ठतानुसार करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त एकाच ठिकाणी १० वर्ष सेवा बजावणाºया डॉक्टरांचा सामावेश आहे तर दोन वर्ष ते तीन वर्ष सेवा केलेल्या डॉक्टरांचादेखील यामध्ये समावेश आहे.समितीमार्फत बदल्याजिल्हा अंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्टÑ वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ (वेतन बॅन्ड १५६००-३९१०० ग्रेड पे ५४००) या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांच्या सन २०१८ या वर्षात नाशिक जिल्हा अंतर्गत जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत सर्वसाधारण बदल्या करण्यात आलेल्या आहेत. सदर वैद्यकीय अधिकाºयांची वास्तव सेवाज्येष्ठता यादी जिल्हा परिषदेने यापूर्वीच संकेतस्थळावर प्रसारित केली आहे. त्याप्रमाणे सर्व तालुका कार्यालयात यासंदर्भात मेल करण्यात आलेला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
जिल्ह्यातील ११७ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 11:05 PM
नाशिक : नाशिक जिल्हा कार्यरत असलेल्या वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ या संवर्गातील सुमारे ११७ वैद्यकीय अधिकाºयांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील सेवाज्येष्ठता यादी जाहीर करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाच ठिकाणी अनेक वर्ष काम करणाºया वैद्यकीय अधिकाºयांच्या प्रस्तावित असलेल्या बदल्यांना अखेर हिरवा कंदील मिळाला आहे.
ठळक मुद्देजिल्हा परिषद : केवळ एकच आक्षेप समितीने जाहीर केली यादी