सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सविस्तर माहिती दिली. कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना सर्वसमावेशक धोरण ठरवा लागेल. पेसा व नॉनपेसा यांच्यात समतोल राखावा लागेल. बदल्या करताना समुपदेशाने नियुक्त्या द्याव्यात असा शासन नियम आहे. त्यामुळे पेसा तालुक्यातील सर्व जागा शंभर टक्के भराव्या लागतील. एकाही तालुक्यात पूर्ण जागा भरल्या गेल्या नाहीत तर कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ शकतो व बदल्यांना अडचण येऊ शकते, असे सांगितले. गेल्या आठवडाभर प्रत्येक केडरच्या एकूण जागा, रिक्त जागांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे असमतोल होऊ नये म्हणून काही तालुक्यांत पदे रिक्त ठेवण्याची शासनाने अनुमती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. बदल्या व्हाव्यात या मताचे प्रशासन आहे; परंतु त्या करताना शासन नियमांचा व न्यायालयाच्या सूचनेचा अवमान होणार नाही याचा विचारही करावा लागणार असल्याचे बनसोड यांनी सांगितले. या चर्चेत महेंद्रकुमार काले यांनीही भाग घेतला, तर अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी नियमाने बदल्या कराव्यात, अशी सूचना केली.
चौकट===
पत्र मागे घेण्याची नामुष्की
आरोग्य व ग्रामसेवकांच्या बदल्या करू नयेत असे पत्र डाॅ. आत्माराम कुंभार्डे यांनी काही दिवसांपूर्वी प्रशासनाला दिले होते. तथापि, सभेत प्रशासनाने वस्तुस्थिती मांडल्यानंतर कुंभार्डे यांनी ग्रामसेवकांच्या बदल्या न करण्याबाबत दिलेले पत्र आपण मागे घेत असल्याचे सांगितले.