शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

नाशिकसह नऊ तहसीलदारांच्या बदल्या

By श्याम बागुल | Published: August 24, 2018 3:50 PM

नाशिकच्या तहसीलदार राजश्री अहिरराव यांची जिल्हाधिकारी कार्यालयातच संजय गांधी योजना तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी निफाडचे प्रभारी शिवकुमार आवळकंठे यांची नेमणूक करण्यात आली आहे. अहिरराव यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांची कायमच नाराजी राहिली होती.

ठळक मुद्देरिक्त जागा भरल्या : विभागात १९ नियुक्त्यासर्वांना तत्काळ पदमुक्त करण्यात यावे शाासनाचे आदेश आहेत.

नाशिक : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागातील १९ तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या असून, यात नाशिकच्या राजश्री अहिरराव यांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरापासून रिक्त असलेल्या बागलाण व नांदगाव या तालुक्यालादेखील या बदल्यांमध्ये पूर्णवेळ तहसीलदार मिळाला आहे. विशेष म्हणजे बागलाणच्या तहसीलदारांच्या बदलीसाठी राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप यानिमित्ताने खरा ठरला आहे.नाशिकच्या तहसीलदार राजश्री अहिरराव यांची जिल्हाधिकारी कार्यालयातच संजय गांधी योजना तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी निफाडचे प्रभारी शिवकुमार आवळकंठे यांची नेमणूक करण्यात आली आहे. अहिरराव यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांची कायमच नाराजी राहिली होती. मध्यंतरी त्यांच्याकडून अर्धन्यायिक कामकाज काढून घेत पंख छाटण्यात आले होते. शिवाय त्यांच्या बदलीसाठी अन्य इच्छुक तहसीलदारांप्रमाणेच खुद्द जिल्हाधिकारीदेखील उत्सुक असल्याची चर्चा कायमच रंगत होती. या बदल्यांमध्ये गेल्या मे महिन्यात बागलाण तहसीलदार म्हणून नियुक्ती झालेल्या वंदना खरमाळे यांची अखेर इगतपुरीत नेमणूक करण्यात आली आहे. अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या बागलाणसाठी नंदुरबारहून प्रमोद हिले यांची नेमणूक करण्यात आली आहे, तर इगतपुरीचे अनिल पुरे यांची नाशिक शहर धान्य वितरण अधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून, धान्य वितरण अधिकारी शर्मिला भोसले यांची विभागीय आयुक्तालयात नियुक्ती झाली आहे. नांदगाव तहसीलदारपदी पारनेरच्या भारती अण्णासाहेब सगरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. नाशिकरोडच्या महसूल प्रबोधिनीच्या अर्चना खेतमाळीस यांची एरंडोल येथे, तर विभागीय आयुक्तालयातील मंजूषा घाडगे यांची महसूल प्रबोधिनी येथे बदली करण्यात आली आहे. धुळ्याचे दत्तात्रय शेजूळ यांची देवळा तहसीलदार म्हणून, तर देवळ्याचे कैलास पवार यांची नगरला बदली झाली आहे. येवल्याचे नरेशकुमार बहिरम यांची पिंपळनेर -साक्रीला बदली झाली असून, त्यांच्या जागी दोंडाईचा येथील रोहिदास वारुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुक्ताईनगरच्या रचना पवार यांची नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली आहे. या बदल्यांमध्ये नाशिक विभागातील १९ तहसीलदारांचा समावेश असून, या सर्वांना तत्काळ पदमुक्त करण्यात यावे, असे शाासनाचे आदेश आहेत.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक