ओझर : गेल्या तीस वर्षा पासुन प्रलंबित असलेल्या ओझर ग्रामपालिकेचे नगर परिषदेत रूपांतर झाल्याची माहिती माजी आमदार अनिल कदम यांनी ओझर सोसायटीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत दिली.यावेळी बोलतांना कदम यांनी आपल्या राजकीय वाटचालीत ओझरकरांचे मोठे प्रेम लाभल्याचे सांगत आपल्या जन्मभूमीला विकासाच्या वेगळ्या ऊंचीवर नेण्याचे आपले स्वप्न असुन ग्रामविकासाला निधीच्या मर्यादा असल्याने ओझर ग्रामपालिकेचे नगरपरिषद रूपांतर केल्याचे सांगितले. ओझर नगरपरिषदेची चार डिसेंबर रोजी शासनाने काढलेल्या परिपत्रकात प्राथमिक घोषणा झाली असुन शासकिय स्तरावर अधिकृत घोषणा सोमवारी (दि.७) होणार असून येत्या महिन्याभरात त्यावरील प्रक्रिया होऊन त्याचे रूपांतर होणार असल्याची माहीती त्यांनी दिली.नगर परिषद झाल्यानंतर कोणतीही करवाढ होणार नसल्याचे स्पष्ट करत भविष्यात रस्ते पाणी वीज याच्यासह दर्जेदार विकास कामे साकारणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.सदर बैठकीत जिल्हा परिषद सदस्य दीपक शिरसाठ, प्रकाश महाले, भास्कर शिंदे, प्रभाकर आढाव, रवींद्र भट्टड, नवनाथ मंडलिक, दिलीप लद्धा, संजय पगार, प्रदीप अहिरे, बबन गवळी, धर्मेंद्र जाधव, नितीन काळे, विकास भट्टड, आशिष शिंदे, प्रशांत पगार, खलील कुरेशी, उस्मान पठाण, आयुब अत्तार, हेमंत जाधव, माधव कदम, घनश्याम जाधव, मधुकर नवघिरे, के. एम शिंदे, रामनाथ वाबळे, भावका शिंदे, यशवंत गवळी, कैलास कर्पे, प्रशांत अक्कर, प्रशांत शिंदे, प्रकाश कडाळे, विजय कुलकर्णी, आयुब पानवाले, दीपक जाधव, कामेश शिंदे, जयप्रकाश भट्टड, विजय भडके, मुकुंद जाजू आदी उपस्थित होते.ओझर विकासासाठी व वाढत्या लोकसंख्येचा विचार करता नगरपरिषद होणे काळाची गरज होती. मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. यात कुठलेही राजकारण नाही. गेली अनेक वर्षे शहराचा विकास खुंटला होता,आता नगरपरिषद झाल्यानंतर समर्पक विकास होईल.- अनिल कदम, माजी आमदार, निफाड.