नाशिक : वन्यप्राण्यांवर विविधमार्गाने येणाऱ्या वेगवेगळ्या संकटांमुळे त्यांचे संवर्धन काळाची गरज बनली आहे. नाशिक जिल्ह्याकरिता अद्यापही वन्यजीवांच्या उपचारासाठी हक्काचे केंद्र वनविभाग उपलब्ध करुन देण्यास अपयशी ठरत आहे. ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’चा प्रस्तावात वारंवार त्रुटी राहत असल्याने अद्यापही नागपूर येथील वनविभागाच्या मुख्यालयाकडून ‘हिरवा कंदील’ मिळू शकलेला नाही. नुकताच काही महिन्यांपुर्वी पाठविण्यात आलेला प्रस्ताव पुन्हा फेटाळला गेला.शहरासह जिल्ह्यात वन्यप्राण्यांची अन्नसाखळी चांगल्याप्रकारे अबाधित आहे; मात्र काळानुरूप या अन्नसाखळीला धोका निर्माण होऊ लागला आहे. कधी विहिरीत पडून तर कधी रेल्वेखाली तर कधी महामार्गांवर वाहनांखाली चिरडून बिबटे, मोर, तरस, लांडगा, कोल्हा, काळवीट यांसारखे वन्यजीव तडफडत प्राण सोडतात किंंवा गंभीररित्या जखमी होऊन उपचाराअभावी मरणयातना भोगतात. त्यामुळे वन्यजीवांच्या उपचाराकरिता अत्यावश्यक असे सर्व सोयीसुविधांनी सज्ज असलेले परिपूर्ण ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर अर्थात स्थलांतरीत उपचार केंद्र अस्तित्वात येणे गरजेचे आहे.नाशिक पश्चिम वनविभागाकडून मागील दोन वर्षांपासून या केंद्रासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. शहराच्याजवळ वनविभागाच्या गोवर्धन-रानमळा शिवारातील रोपवाटिकेची निवड या केंद्राकरिता करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात सादर केलेला प्रस्ताव त्रुटींमुळे नुकताच पुन्हा विनामंजुरी नाशिकला धाडला गेला.जखमांचा दाह शमेना...नाशिक पश्चिम वनविभागाकडून नागपूरच्या प्रधान कार्यालयाकडे उपचार केंद्राच्या मान्यतेसाठी पाठपुरावा केला जात आहे. सव्वा कोटींचा हा प्रकल्प असून, यासाठीचा प्रस्ताव तयार केला जात आहे; मात्र प्रस्ताव अचूक नसल्यामुळे तो वारंवार लांबणीवर पडत आहे.एकीकडे या केंद्राच्या अस्तित्वाचा मार्ग मोकळा होत नसून दुसरीकडे वन्यजीवांचे अस्तित्व मात्र घात-अपघातांमुळे धोक्यात आले आहे. मुक्याजीवांच्या जखमांचा दाह शमता शमत नसल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये नाराजीचा सूर आहे.--‘ट्रान्झिट’ साठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे. प्रस्ताव परिपूर्ण तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. नागपूर प्रधान कार्यालयाला पुन्हा अचूक व परिपूर्ण प्रस्ताव नव्याने पाठविणार आहोत. पुढील आर्थिक वर्षापर्यंत नाशिकमध्ये हा प्रकल्प र्काान्वित झालेला असेल. जिल्हा नियोजन समितीच्या वन्यजीव संवर्धनासाठी मिळालेल्या निधीमधून काही रक्कम येथे उपयोगात आणण्याचीही तयारी आहे.- शिवाजी फुले, उपवनसंरक्षक, नाशिक पश्चिम भाग
वन्यप्राणी संवर्धन रामभरोसे : ‘ट्रान्झिट’च्या प्रयत्नांना वारंवार ‘खो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 2:29 PM
नाशिक : वन्यप्राण्यांवर विविधमार्गाने येणाऱ्या वेगवेगळ्या संकटांमुळे त्यांचे संवर्धन काळाची गरज बनली आहे. नाशिक जिल्ह्याकरिता अद्यापही वन्यजीवांच्या उपचारासाठी हक्काचे ...
ठळक मुद्देत्रुटींमुळे प्रस्तावा पडतोय सतत लांबणीवरजखमांचा दाह शमेना...