शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

३० तज्ज्ञ संचालकांवर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:32 AM

नाशिक : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर तत्कालीन भाजप सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय महाविकास ...

ठळक मुद्देबाजार समित्यांवरील नियुक्ती : सहकार विभागाला आदेशाची प्रतीक्षा

नाशिक : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर तत्कालीन भाजप सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतल्याने नाशिक जिल्ह्यातील बारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३० तज्ज्ञ संचालकांच्या पदांवर संक्रांत येणार आहे. शासनाने दोन दिवसांपूर्वी हा निर्णय घेतला असला तरी, अद्याप सहकार विभागाला त्याच्या आदेशाची प्रत प्राप्त झालेली नाही.नाशिक जिल्ह्यात १७ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या असून, त्यातील बारा बाजार समित्यांनी भाजप सरकारच्या आदेशाचे तत्काळ पालन करून तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या केल्या होत्या, तर नामपूर, सटाणा, उमराणे या तीन बाजार समित्यांंनी नेमणूक केली नव्हती, एका बाजार समितीवर प्रशासकाची नेमणूक असल्याने उर्वरित बाजार समित्यांमध्ये ३० तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती करण्यात आली होती.या संचालकांच्या नेमणुकीतून राष्टÑवादी, कॉँग्रेसच्या ताब्यातीलबाजार समित्यांवर दबाव टाकण्याचीखेळी त्यामागे होती. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच, भाजपचे बाजार समितीवरील वर्चस्व नष्ट करण्यासाठी तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक बाजार समितीत एकूण २६ संचालक आहेत. त्यात शासन नियुक्त सुनील खोडे, हंसराज वडघुले, रामदास भोये व हेमंत खंदारे या चौघांची तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती केली होती. नाशिकप्रमाणेच लासलगाव, विंचूर, पिंपळगाव बाजार समितीतही प्रत्येकी चार संचालकांच्या तर अन्य बाजार समित्यांमध्ये प्रत्येकी दोन संचालकांची नियुक्ती करण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी, नियुक्त्या रद्द करण्याबाबत अद्याप आदेश प्राप्त झालेला नसल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी दिली. बाजार समितीच्या तज्ज्ञ संचालकांच्या नेमणुकांची माहिती मात्र शासनाला पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.राज्यातील बाजार समित्यांवर राष्टÑवादी व कॉँग्रेसचे वर्चस्व असल्याने सहकार विभागातील दोन्ही कॉँग्रेसचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजप सरकारने प्रत्येक बाजार समित्यांच्या आर्थिक उलाढालीवर त्या त्या प्रमाणात तज्ज्ञ संचालक नेमण्याचा निर्णय घेतला होता. अर्थातच या तज्ज्ञ संचालकांचा बाजार समितीच्या कारभारात काय फायदा झाला हे गुलदस्त्यात असले तरी, असे संचालक नेमण्याचा सरकारचा अधिकार असल्याने साहजिकच त्या पदांवर भाजप, संघाशी निगडित कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यात आली होती.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड