कळवण : अभोणागावाजवळील नाल्यावर अरुंद व कमी उंचीचा, जीर्ण झालेला पूल अस्तित्वात असल्यामुळे हा पूल वाहतुकीस धोकेदायक झालेला आहे. या रस्त्यावरून वाहनांची वाहतूक वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने जुना पूल पाडून त्याच ठिकाणी नवीन उंच व जास्त रुंदीचा नवीन पुलाच्या कामास प्रारंभ होत असल्यामुळे वाहतुकीस पर्यायी व्यवस्था नसल्याने अभोण्याकडील वाहतूक आता नांदुरी मार्गे होणार आहे. त्यामुळे एस. टी. बसेससह खासगी वाहने आता नांदुरी किंवा वाडीमार्गे अभोण्यागावाकडे जातील असे सूत्रांनी सांगितले.बोरगाव-चणकापूर अभोणा कोल्हापूर फाटा रस्ता प्रजिमा-८ सा. क्र. २४/५०० अभोणा गावाजवळ नाल्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यात येणार असून, सदर रस्ता देखभाल व दुरुस्तीसाठी आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. सदरच्या रस्त्यावर अभोणा गावाजवळ नाल्यावर सध्या अरुद व कमी उंचीचा, जीर्ण झालेला पूल अस्तित्वात आहे.हा पूल वाहतुकीस धोकेदायक झालेला असल्याने तसेच या रस्त्यावरून वाहनांची वाहतूक वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने जुना पूल पाडून त्याच ठिकाणी नवीन उंच व जास्त रुंदीचा पूल बांधणे या कामास शासनाकडून मान्यता मिळालेली असून, कामाची निविदाप्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पुलाचे बांधकामासाठी संबंधित ठेकेदारास कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत.
ठेकेदाराकडून प्रत्यक्ष कामास १२ एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाजवळून पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने, कळवणकडून कोल्हापूर फाटामार्गे अभोणाकडे जाणारी व अभोणा कोल्हापूर फाटामार्गे कळवणकडे येणारी सर्व एस. टी. बस वाहतूक काम पूर्ण होईपर्यंत नांदुरीमार्गे वळविण्यात येणार आहे.