शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

उड्डाणपुलावरून दुचाकी वाहनांची वाहतूक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 12:46 AM

महामार्गावरील वाहतूक कोंडी होऊ यासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलावरून केवळ चारचाकी व मालवाहू वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी असली तरी दुचाकी वाहनधारकांकडून आता उड्डाणपुलाचा वाहतुकीसाठी वापर सुरू झाल्याने अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

पंचवटी : महामार्गावरील वाहतूक कोंडी होऊ यासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलावरून केवळ चारचाकी व मालवाहू वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी असली तरी दुचाकी वाहनधारकांकडून आता उड्डाणपुलाचा वाहतुकीसाठी वापर सुरू झाल्याने अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे वाहतूक शाखेचे उड्डाणपुलावरून होणाऱ्या या दुचाकी वाहतुकीकडे दुर्लक्ष झाल्याचे  दिसून येत आहे.  क.का. वाघ महाविद्यालय ते द्वारकापर्यंत व तेथून पुढे असलेल्या उड्डाणपुलावरून दुचाकीधारक सर्रासपणे ये-जा करीत असल्याचे दैनंदिन बघायला मिळते.  उड्डाणपुलावरून दिवसभर चारचाकी, मालवाहू वाहने तसेच अवजड वाहनांची ये-जा सुरू असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनात अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. काही दिवसांपूर्वी दुचाकी तसेच चारचाकी वाहनांत अपघात झाल्याची घटना घडून काही जण जखमी झालेले होते. या उड्डाणपुलावरून दुचाकीवाहन धारकांना वाहने नेण्यास मनाई असल्याचे वाहतूक पोलीस शाखेकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र दुचाकीधारक नियमांची पायमल्ली करून उघडपणे उड्डाणपुलावरून दुचाकीवाहनांची वाहतूक करीत असल्याचे दिसून येते.रिक्षांचाही उड्डाणपुलावर वावरउड्डाणपुलावरून चारचाकी वगळता दुचाकी तसेच रिक्षांना वाहतूक करण्यास मनाई असली तरी दुचाकी वाहनधारकांपाठोपाठ काही बेशिस्त रिक्षाचालक या उड्डाणपुलावरून प्रवासी वाहतूक करीत असतात. वाहतूक शाखेकडून अशा बेशिस्त वाहनचालकांविरु द्ध कारवाई करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtwo wheelerटू व्हीलर