सिडको : महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या घरातील तसेच औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांकडील कचरा गोळा करण्यासाठी ठेकेदारांमार्फत घंटागाडीची व्यवस्था केली आहे.अनेकदा घंटागाडी ही कचरा गोळा करण्यासाठी फिरकतच नसल्याची ओरड होत असताना आता चक्क घंटागाडीवरील कर्मचारी हे कचरा गोळा करण्यासाठी गेलेल्या नागरिकांकडून आर्थिक तडजोड करीत असल्याने अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योजक त्रस्त झाले आहे. नागरिकांकडील कचरा गोळा करण्यासाठी मनपाने मोफत सुविधा केलेली असतानाही संबंधित कर्मचारी हे नागरिकांकडून आर्थिक तडजोड करीत असल्याने याबाबत महापौर, मनपा आयुक्तांची भेट घेऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.महापालिकेने मनपा हद्दीतील नागरिकांच्या घरातील कचरा तसेच औद्योगिक वसाहतीतील कचरा गोळा करण्यासाठी ठेकेदारामार्फत घंटागाडीची व्यवस्था केली आहे. नियमानुसार नागरिकांचा कचरा गोळा करण्यासाठी दररोज अथवा एक दिवसाआड तरी घंटागाडी नागरिकांकडे जाणे आवश्यक असतानाही अनेकदा चार चार दिवस उलटूनही घंटागाडी जातच नसल्याचे प्रकारही अनेकदा होत आहे. मनपाने घंटागाडीचालकांचा गैरव्यवहार त्वरित न थांबविल्यास आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे माजी नगरसेवक अमोल जाधव, अजय पाटील, रवी गामणे, सचिन ठोंबरे, शैलेश कर्पे, अवि जाधव यांनी दिला आहे. याबाबत नगरसेवकदेखील प्रभागसभेत तसेच महासभेत लक्षवेधी मांडत असून, संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याचा ठराव झाल्यानंतरही ठेकेदारावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येत असून, ठेकेदार कोणालाही जुमानत नसल्याचे चित्र बघावयास मिळते.
घंटागाडीचालकांकडून उद्योजकांची लुबाडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 1:16 AM
सिडको : महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या घरातील तसेच औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांकडील कचरा गोळा करण्यासाठी ठेकेदारांमार्फत घंटागाडीची व्यवस्था केली आहे. अनेकदा ...
ठळक मुद्देवारंवार पैशांची मागणी : कारवाई करण्यात यावी; कचरा उचलण्यास टाळाटाळ