ओझरटाऊनशिप : येथील मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या दहावा मैल येथे पुढे जाणार्या मालट्रकने स्पिड ब्रेकरवर अचानक ब्रेक मारून वेग कमी केल्याने मागे येत असलेली ट्रॅव्हल बस त्या मालट्रकवर धडकून झालेल्या अपघातात दोन प्रवासी गंभीर तर पाच जण किरकोंळ जखमी झाले.रविवारी (दि.२३) पहाटे ४ वाजेच्या सुमारास ओझरकडून नाशिक कडे जाणाऱ्या मालट्रकचा (डब्ल्यूबी ३३ सी ४४०६) दहावा मैल, ओझर येथील स्पीड ब्रेकर वर वेग कमी झाल्याने पाठीमागून भरधाव येणारी चौहाण कंपनीची इंदौर ते पुणे ट्रॅव्हल्स बस (एमपी ०९ एफए ९६९५) वेगात येऊन ट्रकवर धडकली.या अपघातात ट्रॅव्हल्स बस चालक देवकरण पुंजीलाल चौहाण ९३२, रा. असराबाद बिजुर्ग, इंदोर) याच्यासह दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. तर क्लिनर व इतर चौघे किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक भगवान मथुरे,महामार्ग पोलिस अधिकारी वर्षा कदम यांच्यासह ओझर व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीना नाशिक येथे रवाना केले.तसेच ट्रक मधील राजगिरे भरलेली पोती व त्यातील माल रस्त्यावर पडलेला असताना तो पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाजूला करून, अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला केली व विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. अधिक तपास ओझर पोलीस करीत आहे.
ट्रॅव्हल बस ट्रकवर धडकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 12:13 AM
मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या दहावा मैल येथे पुढे जाणार्या मालट्रकने स्पिड ब्रेकरवर अचानक ब्रेक मारून वेग कमी केल्याने मागे येत असलेली ट्रॅव्हल बस त्या मालट्रकवर धडकून झालेल्या अपघातात दोन प्रवासी गंभीर तर पाच जण किरकोंळ जखमी झाले.
ठळक मुद्देदहावा मैलावर अपघात : दोन गंभीर, पाच किरकोळ जखमी