शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
3
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
5
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
6
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
7
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
9
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
10
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
11
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
12
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
13
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
14
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
15
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
18
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
19
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
20
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी

चिंचवड ते युरोप ‘केशर’चा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:17 AM

नाशिक जिल्ह्यातील हरसूलजवळील चिंचवड या छोट्याशा आदिवासीबहुल गावातील भोये व वाघेरे कुटुंबाचा केशर आंबा यावर्षी युरोपला निघाल्याने जिल्ह्यात प्रथमच इस्त्रायल पद्धतीचा वापर करून आंबा परदेशात पाठविण्याचा मान चिंचवड या गावाला मिळाला आहे. पारंपरिक शेती सोडून आधुनिक तंत्राचा अवलंब करून राज्यात प्रथमच इस्त्रायल व जर्मनपद्धतीने केशर आंबा लागवड करून आदिवासी भागातील जनार्दन वाघेरे ऊर्फ जेडी व अमोल भोये या तरुण दुकलीचा आंबा चिंचवड ते युरोप प्रवास करणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील हरसूलजवळील चिंचवड या छोट्याशा आदिवासीबहुल गावातील भोये व वाघेरे कुटुंबाचा केशर आंबा यावर्षी युरोपला निघाल्याने जिल्ह्यात प्रथमच इस्त्रायल पद्धतीचा वापर करून आंबा परदेशात पाठविण्याचा मान चिंचवड या गावाला मिळाला आहे. पारंपरिक शेती सोडून आधुनिक तंत्राचा अवलंब करून राज्यात प्रथमच इस्त्रायल व जर्मनपद्धतीने केशर आंबा लागवड करून आदिवासी भागातील जनार्दन वाघेरे ऊर्फ जेडी व अमोल भोये या तरुण दुकलीचा आंबा चिंचवड ते युरोप प्रवास करणार आहे. हरसूल परिसरात पारंपरिक शेती म्हणून भात, नागली, वरई, भुईमूग करतात. निसर्गाची अवकृपा, बाजारपेठेत योग्य मोबदला न मिळणे तसेच मजुरांची चिंता यामुळे वडिलांची जागा होती तेथे फक्त योग्य नियोजन करून अधिक मोबदला मिळेल असे नवीन पीक घ्यायचे ठरविले. वाघेरे कुटुंबातील जनार्दन वाघेरे हे कोल्हापूर येथे कृषी सहायक म्हणून काम  करत असताना त्यांनी इस्त्रायलच्या  शेतीचा अभ्यास केला व चिंचवड येथे आपण अशीच शेती करू शकतो  हे आव्हान स्वीकारून आई-वडील  व भोये कुटुंबाला विश्वासात घेऊन चार एकरावर प्रत्यक्ष काम सुरू  केले.नवीन इस्त्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग लागवड ३ बाय १४ फुटांवर एकरी १००० झाडांची लागवड केली. लागवड करताना १४ फुटांवर लाइन मारल्या. जेसीबीने चर मारले. चर शेणखत व मातीने भरून १४ नोव्हेंबर २०१३ रोजी रोपांची लागवड केली. ठिबक सिंचन करून पाणी दिले. कोल्हापूर येथे राहून सोशल मीडियावर आंब्याची निगा कशी राखायची याचे ज्ञान आत्मसात करून फोनवर आपल्या व भोये कुटुंबाला सूचना देऊन योग्यवेळी फवारणी करून घेतली. लागवडीसाठी एकरी ८० हजार रुपये खर्च आला. दुसऱ्या वर्षी आंब्याला मोठ्या प्रमाणात मोहर आल्याने सर्व कुटुंब आनंदित झाले. मार्च २०१५ मध्ये झाडांना आंबे लागल्यावर गावात व परिसरात चर्चा सुरू झाली. दुसºया वर्षी ३ टन केशर सेंद्रीय पद्धतीने पिकल्यामुळे नाशिक परिसरातील व्यापारी थेट बागेत येऊन माल खरेदी करू लागले. त्यामुळे बाजारपेठेमध्ये माल पोहोचवण्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च वाचला.  पहिल्या वर्षी एकरी १,८०,००० ेरुपये, दुसºया वर्षी एकरी १,९०,००० रुपये, तिसºया वर्षी एकरी २,२०,००० रुपये नफा झाला. त्यानंतर प्रत्येक वर्षी आंब्याच्या नवीन जाती, चिकू वगैरे असे नवीन रोपांची लागवड करण्यास सुरुवात केली. २०१६ मध्ये सुंदर दामोदर नर्सरीसुद्धा सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्याची जबाबदारी अमोल भोये व नितीन भोये या दोघांवर दिली. त्यात अमोल भोये शिक्षक म्हणून पालघर जिल्ह्यात नोकरी करतो. त्यास नितीनची साथ मिळाल्याने हजारो रोपांची लागवड पहिल्या वर्षी करण्यात आली. त्यानंतर आंबा पाहण्यासाठी राज्याबरोबर देशातीलसुद्धा शेतकरी, व्यापारी, कृषी अभ्यासक येऊ लागले. लागलेलं फळ आणि कमी जागेत कमी पैशांत भरपूर नफा यामुळे अनेक शेतकरी जागेवर रोपांची आॅर्डर क रू लागेल. आजमितीस १५००० रोपांची आॅर्डर सुंदर दामोदर नर्सरीकडे आहे. तीन वर्षांत आलेले यश पाहून एक्स्पोर्ट करण्यासाठी प्रयत्न चालू केले. एक्सपोर्ट प्रमाणपत्र कृषी खात्यातील अधिकाºयांच्या मदतीने ५ वर्षांसाठी मिळाले. त्यांच्या नियमानुसार सेंद्रीय खताचा वापर केला. फेसबुकच्या माध्यमातून नामधारी एक्सपोर्ट कंपनीने ते बघितले व त्यांनी १२० रुपये किलो या भावाने माल ठरवला.  त्यासाठी कंपनीचे माणसे बागेत येऊन गेले व एक्स्पोर्ट साठी लागणारे साहित्य जसे कि प्रत्येक फळ ला पैकींग साठी लागणारी इंपोर्टेड बॅग दिली. आज २५० ते ३०० ग्राम वजनाचे फळ प्रत्येक झाडास आले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी