४ कोविडसाठी
चालकसंख्या - ५
--------
१ नॉनकोविडसाठी
१ चालक
-------------------------
शफीक शेख/ मालेगाव : मालेगाव महापालिका आरोग्य विभागाकडे एकूण ५ रुग्णवाहिका असून त्यातील ४ कोविडसाठी आहेत. पाचही रुग्ण वाहिकांसाठी पाच चालक असून त्यांना रात्रंदिवस चोवीस तास कोविड काळात सेवा बजावावी लागत आहे.
दिवसातून कधी वेळ मिळेल तेव्हाच फक्त घरी जाता येते. सध्या शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून मृतांची संख्या देखील वाढली असल्याने रुग्णालयातून मृतदेह घेऊन जाण्याबरोबरच त्यांचा अंत्यविधीदेखील रुग्णवाहिका चालकांनाच करावा लागत आहे. महापालिकेकडून सॅनिटायझर, हँड ग्लोज आणि मास्क पुरविले जात नसल्याची तक्रार रुग्णवाहिका चालकाने केली. अन्नपूर्णा सेवा समिती या सामाजिक संस्थेतर्फे दिवसाआड मोफत मास्क दवाखान्यातून विकत आणून दिले जातात. रुग्णवाहिका चालकांना मनपाकडून कोणतेही पीपीई किट देण्यात आलेले नाही. त्यामुळे स्वखर्चाने कॉटनचे पीपीई किट शिवून घेतल्याचे नाना शिरसाठ या रुग्णवाहिका चालकाने सांगितले. मृतदेह दवाखान्यातून नेल्यानंतर त्याचा अंत्यविधी उरकून आम्हीच घरी खासगी शिवून घेतलेले कॉटन सुती किट धुवून टाकतो आणि पुन्हा तेच वापरतो असे त्यांनी सांगितले. मनपा व्यतिरिक्त खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्ण दगावल्यास त्यांचेही फोन येतात. तेथून मृतांना घेऊन अंत्यविधी उरकावा लागतो.
कोट.....
पीपीई कीट, मास्क पुरविले जात नसल्याची तक्रार
आम्ही चोवीस तास महापालिकेला सेवा देत आहोत. मृतांचे प्रमाण वाढल्याने कधी कधी एकाच दिवसात दहा ते बारा मृतदेह नेऊन त्यांचा अंत्यविधी करावा लागतो. आम्ही सॅनिटायझर, मास्क आणि हँड ग्लोज आणि खासगी सुती पीपीई किटचा वापर करतो.
- मुख्तारभाई, चालक
कोट.....
खासगी हॉस्पिटल मृतदेह नेण्याकरिता बॉडी पॅकिंग किट देत नाहीत. त्यामुळे प्लास्टिकमध्ये गुंडाळून मृतदेह दिला जातो. तशाच अवस्थेत अंत्यविधी करावा लागतो. सहसा घरी जातच नाही. केवळ दोन ते तीन तास झोप मिळते. त्यामुळे कुटुंबाकडे लक्ष देता येत नाही.
- नाना शिरसाठ, चालक
कोट......
चोवीस तास कामावर असतो. सॅनिटायझर, मास्क आणि ग्लोजचा वापर करतो. भीती वाटत नाही. परंतु स्वतःची काळजी घेतो. महापालिकेने पीपीई किट उपलब्ध करून द्यावे तसेच मास्क, ग्लोज पुरवावेत.
- सद्दाम शेख, चालक
कोट....
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे पाच रुग्णवाहिका असून एक शववाहिका आहे. तीन रुग्णवाहिका कोविडसाठीच आहेत. एक शववाहिका पूर्णपणे पॅक(बंद) अशी ठेवण्यात येणार आहे.
- डॉ. सपना ठाकरे, वैद्यकीय अधिकारी, मनपा