शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

एसटीच्या दांडेलशाहीपुढे प्रवासी वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 8:48 PM

ओझर : नाशिक नंतर झपाट्याने वाढत असलेल्या शहरांमध्ये ओझर, पिंपळगावचा उल्लेख होऊ लागला असताना प्रवाश्यांच्या सेवेसाठी ब्रीद असलेल्या एसटीची साडेसाती अद्याप दोन्ही शहरांना भोगावी लागत असताना सामान्य प्रवासी, नोकरदार, व्यापारी सदर त्रासाला कंटाळले आहे. अनेक वाचकांचा ओझर सांगितल्यावर वाढणारा आवाज प्रवाश्यांना धडकी भरवतो आहे. अंतर लवकर कापण्यासाठी अनेक बस गावात न येताच महामार्गावरून थेट जात असून त्यामुळे कित्येक तास प्रवाश्यांना स्टँड वर ताटकळत उभे राहावे लागत आहे.

ठळक मुद्देओझर : अनेक गाड्या बस स्थानकात न येताच होतात पसार

ओझर : नाशिक नंतर झपाट्याने वाढत असलेल्या शहरांमध्ये ओझर, पिंपळगावचा उल्लेख होऊ लागला असताना प्रवाश्यांच्या सेवेसाठी ब्रीद असलेल्या एसटीची साडेसाती अद्याप दोन्ही शहरांना भोगावी लागत असताना सामान्य प्रवासी, नोकरदार, व्यापारी सदर त्रासाला कंटाळले आहे.अनेक वाचकांचा ओझर सांगितल्यावर वाढणारा आवाज प्रवाश्यांना धडकी भरवतो आहे. अंतर लवकर कापण्यासाठी अनेक बस गावात न येताच महामार्गावरून थेट जात असून त्यामुळे कित्येक तास प्रवाश्यांना स्टँड वर ताटकळत उभे राहावे लागत आहे.प्रत्येक एसटीच्या तिकिट मशीनवर ओझर असा उल्लेख ठळक असताना व ओझर येथे बस स्थानक असून देखील दोन तीन आगाराच्या बसेस वगळता चालक, वाहकांनी महामार्गावर थांबा थाटल्याने प्रवाश्यांना जीव मुठीत घेत प्रवास करावा लागत आहे. असाच अनुभव नाशिक ते मालेगाव बस (एमएच ११/९३१८) मध्ये अनुभवला गेला असून फलकावर ठळकपणे ओझर असा उल्लेख असताना बस सर्रासपणे बाहेरून जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे.सामान्य प्रवाश्यांचे नेमके काय बिघडले आहेत ते न समजण्यापलीकडे गेल्याने सर्वच एसटी प्रवासी वैतागल्याचे चित्र असून रीतसर ओझरचे तिकीट देऊन सटाणा, मालेगाव, साक्र ी आगाराचे काही चालक वाहक सीबीएसला नकार देत असताना बळजबरीने प्रवासी बसलाच तर ताकीद देऊन भर महामार्गवर प्रवाश्यांना उतरवून सुसाट निघून जात आहे. यामुळे प्रवाश्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.तिकिटावर जेथे जात आहे ते आल्यास तो थांबा आहे असे नियम असून आज पर्यंत शेकडो प्रवाश्यांना या अजब नियमांचा सामना करावा लागत आहे. यामुळे सटाणा, साक्र ी, नंदुरबार, मालेगाव, शिरपूर आदी ठिकाणच्या नियमति बसेसना ओझर रीतसर थांबा आहे परंतु प्रवाशाला बसतानाच ओझरला बाहेर उतरावे लागेल असा दम काही वाहक देतात तर अनेक चालक गावात येण्याचा कंटाळा करत असतात.सदर समस्या गंभीर असून प्रशासनाने याकडे लक्ष घालावे जेणेकरून उत्पन्न वाढ, सतत तोट्यात चालणाऱ्या एसटीला काही प्रमाणात हातभार लागविनावाहक बसेस वगळता प्रत्येक मशीनवर ओझर, पिंपळगाव थांब्याचा उल्लेख असताना चालकाला सदर स्थानकात बस घेऊन जाणे अनिवार्य आहे. याने एसटीचे उत्पन्न वाढणार असून नियमानुसार न चालणाºया चालक, वाहकांवर कडक कार्यवाही करण्याचे धोरण सुरू केले आहे. प्रवाश्यांना देखील विनंती आहे की तिकिटावर थांबा असताना चालक वाहकाने बस स्थानकात घेऊन न गेल्यास आपली तक्र ार बस क्र मांकसह द्यावी त्यानंतर कारवाइ नक्की होईल.- नितीन मैन्डविभाग नियंत्रक, नाशिक. 

टॅग्स :MSRDCराज्य रस्ते विकास महामंडळTrafficवाहतूक कोंडी