शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

धार्मिक स्थळांच्या पुराव्यांसाठी विश्वस्तांची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 12:32 AM

महापालिकेने न्यायालयाच्या निर्देशानुसार, शहरातील रस्त्यावर अडथळा ठरणाºया १५० अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध येत्या ८ नोव्हेंबरपासून कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही धार्मिक स्थळांबाबत संबंधित संस्था-विश्वस्तांनी आवश्यक ते दस्तावेज व पुरावे सादर करण्यासाठी धावाधाव चालविली आहे. दरम्यान, पुरावे दिल्यास सदर स्थळांवर कारवाई थांबविण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या उपआयुक्तांनी दिली आहे.

नाशिक : महापालिकेने न्यायालयाच्या निर्देशानुसार, शहरातील रस्त्यावर अडथळा ठरणाºया १५० अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध येत्या ८ नोव्हेंबरपासून कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही धार्मिक स्थळांबाबत संबंधित संस्था-विश्वस्तांनी आवश्यक ते दस्तावेज व पुरावे सादर करण्यासाठी धावाधाव चालविली आहे. दरम्यान, पुरावे दिल्यास सदर स्थळांवर कारवाई थांबविण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या उपआयुक्तांनी दिली आहे.महापालिकेने सन २००९ पूर्वीची रस्त्यांवर अडथळा ठरणारी १५० अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची तयारी चालविली आहे. त्यासाठी येत्या ८ नोव्हेंबरपासून कारवाई केली जाणार आहे. महापालिकेने त्यासाठी संबंधित धार्मिक स्थळांना नोटिसाही चिकटविल्या आहेत.  महापालिकेच्या या अल्टिमेटमनंतर काही धार्मिक स्थळांंच्या संस्था अथवा विश्वस्तांनी महापालिकेच्या विभागीय कार्यालयांमध्ये धाव घेतली  असून, आवश्यक ते पुरावे सादर केले जात आहेत. त्यात काही धार्मिक  स्थळे ही महापालिकेच्या सध्या ताब्यात नसलेल्या डीपीरोडमध्ये असल्याने ती वगळली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीतील आकडा आणखी कमी होण्याची शक्यता  आहे.दरम्यान, धार्मिक स्थळांच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेणारे शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर आणि भागवत आरोटे यांनी अतिरिक्त आयुक्तांकडे एका पत्राद्वारे आजवर केलेल्या कारवाईची आणि येत्या काळात करण्यात येणाºया कारवाईबाबतची माहिती मागविली आहे. दातीर यांनी पत्रात म्हटले आहे, उच्च न्यायालयात धार्मिक स्थळे हटविण्याच्या कारवाईविरोधी याचिका दाखल करण्यात आलेली होती.  सदर याचिकेवर न्यायालयाने निर्णय देत अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्यापूर्वी काही मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्याचे आदेशित केले होते. या सूचनेनंतर न्यायालयाने सदर याचिका निकाली काढली होती. त्यामुळे न्यायालयाने सांगितलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब होतो आहे किंवा नाही, याची माहिती देण्याची मागणी दातीर यांनी केली आहे. प्रशासनाकडून पुन्हा पडताळणी महापालिकेकडून १५० अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधी कारवाई केली जाणार आहे. मात्र, कारवाई करण्यापूर्वी प्रशासनाकडून पुन्हा एकदा प्रत्येक प्रकरण तपासून पाहून पडताळणी केली जात आहे. प्रत्यक्ष कारवाईत कुठे अडथळा येणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. दरम्यान, मोकळ्या भूखंडांवरील धार्मिक स्थळांविरुद्ध या मोहिमेत कारवाई केली जाणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केलेले आहे.