सिन्नर: सिन्नर तालुक्यात गुरुवारी 35 नवे रुग्ण आढळून आले आहेत. सिन्नर शहरात 19 तर ग्रामीण भागात 16 रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील 207 रुग्णांवर सिन्नर ग्रामीण रुग्णालय व इंडिया बुल्स कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आजपर्यंत तालुक्यात 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर 592 रुग्णांना उपचार करून सोडून देण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.शहरातील लोंढे गल्लीत ३ रुग्ण आढळले असून त्यात ७२ वर्षीय पुरुष व २२ वर्षीय २ युवकांचा समावेश आहे. कमलनगरमध्ये ६ रुग्ण आढळले असून त्यात ३४ व ३६ वर्षीय महिला, ६ व ५ वर्षीय बालक, १४ व १५ वर्षीय मुलांचा समावेश आहे. उद्योग भवन येथे ३६ वर्षीय पुरुष व ६१ वर्षीय महिला, डुबेरे नाका येथे २८ वर्षीय महिला, ३१ वर्षीय पुरुष, शिवाजी नगर ४१ वर्षीय पुरुष, ढोके नगर ३४ वर्षीय पुरुष, गावठा १९ वर्षीय युवती, रेणुका नगर ४६ वर्षीय पुरुष, खर्जे मळा ७० वर्षीय पुरुष यांचा त्यात समावेश आहे. तर उपजिल्हा रुग्णालयातील ३० वर्षीय बाधित निघाला आहे.ग्रामीण भागात माळेगाव येथे ६ रुग्ण आढळले असून त्यात ३२ वर्षीय महिला, ३४, २९ व ३० वर्षीय पुरुष तर २ वर्षीय बालक व ९ वर्षीय बालिकेचा समावेश आहे. माळेगाव एमआयडीसी मध्ये ५५ वर्षीय पुरुष व ३४ वर्षीय महिला बाधित निघाले आहेत. चिंचोलीत ४ रुग्ण आढळले असून ७० व ५० वर्षीय पुरुष, ३४ वर्षीय महिला व १७ वर्षीय युवकाचा समावेश आहे. मनेगाव येथे ४३ वर्षीय पुरुष, वडगाव पिंगळा १७ वर्षीय युवक, ब्राम्हणवाडेत ३७ वर्षीय पुरुष, गुरेवाडीत ३५ वर्षीय पुरुष करोनाबाधित असल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांची संख्या 818 झाली आहे.