खर्डे (वार्ताहर ) तालुक्यातील खालप शिवारात विषबाधा झालेल्या मेंढ्यांवर पशुसंवर्धन विभागाने उपचार केले असून ,यातील मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन करण्यात आलेआहे. त्यांची नमुने रोगनिदान होण्यासाठी पुण्याला पाठविण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ . झोड यांनी दिली .गेल्या सप्ताहात देवळा तालुक्यातील खालप शिवारात वास्तव्यास असलेल्या मेंढ्यांच्या कळपातील काही मेंढ्याना विषबाधा झाली होती . यातील बाधित काही मेंढ्या मृत मुखी पडल्याने मेंढपाळांचे मोठ्या प्रमाणत आर्थिक नुकसान झाले आहे . याची दखल घेऊन पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ झोड ,पशुवैद्यकीय चिकित्सक डॉ पाटील , जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गर्जे , देवळा पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ . पी . जे . अलई यांनी खालप येथे जाऊन विषबाधा झालेल्या मेंढ्यावर उपचार केले . तसेच यातील चार मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन करून त्यांची नमुने पुढील उपचारासाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत . अशी माहिती पशुवैधकीय विभागाकडून देण्यात आली आहे . आमदार डॉ . राहुल आहेर यांनी या घटनेची दखल घेऊन पशुवैधकीय विभागाला मेंढ्यांवर तत्काळ उपचार करण्याचे आदेश दिले होते . दरम्यान , विषबाधा होऊन मरण पावलेल्या मेंढ्यांमुळे सदर मेंढपाळांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून , संबंधित विभागाकडून नुकसान भरपाई मिळावी . अशी मागणी पशुपालकांनी केली आहे .
विषबाधा झालेल्या मेंढ्यांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 4:28 PM
खर्डे (वार्ताहर ) तालुक्यातील खालप शिवारात विषबाधा झालेल्या मेंढ्यांवर पशुसंवर्धन विभागाने उपचार केले असून ,यातील मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन करण्यात आलेआहे. त्यांची नमुने रोगनिदान होण्यासाठी पुण्याला पाठविण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ . झोड यांनी दिली .
ठळक मुद्दे खालप शिवारातमेंढपाळांचेनुकसान