नाशिक : मुंबईनाक्यावरून चांडक सर्कलच्या दिशेने जाताना महामार्ग बसस्थानकालगत वळणावरच रस्त्याच्या मध्यभागी झाड होते. या झाडामुळे अनेकदा वळण घेताना अपघातांना निमंत्रण मिळत होते. त्यामुळे महापालिकेने आठवड्यापूर्वी येथील झाड हटविले, परंतु रस्ता तयार करण्याबाबत अद्याप तत्परता दाखविली जात नसल्याने अडथळा दूर होऊनदेखील गैरसोय कायम आहे.मुंबईनाक ा-कालिका मंदिर हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून, रस्त्यावरील वाहतुकीच्या तुलनेने हा रस्ता अरूंद पडतो. मुंबईनाका सर्कलपासून थेट गडकरी चौकापर्यंत या मुख्य रस्त्यावरून दुहेरी वाहूतक चालते. गडकरी चौकापर्यंत रस्ता एकेरी आहे. मध्यभागी दुभाजकही टाकण्यात आलेले नाही कारण रस्त्याच्यी रुंदी कमी आहे. महामार्ग बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच वळणावर मध्यभागी असलेल्या झाडामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. अनेकदा लहान-मोठ्या अपघाताच्या घटनाही घडत होत्या. यामुळे रस्त्यामधील वळणावर असलेले हे झाड तोडण्याची मागणी जोर धरू लागली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने मागील आठवड्यामध्ये रात्रीच्या सुमारास सलग साडेतीन तास अथक परिश्रम घेऊन सुमारे शंभर वर्षांहून अधिक जुने झाड हटविले. या झाडाचा बुंधा जमिनीखालून काढण्यासाठी मोठा खड्डा जेसीबीद्वारे करण्यात आला.
झाड हटविले; मात्र गैरसोय कायम : मुंबईनाका
By admin | Published: April 12, 2017 10:22 PM