ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपारीक ड्रेस परिधान करून डोक्यावर तुळस, तसेच अनेक प्रकारातील वृक्षांची रोपे घेऊन गावातून घोषणा देत वृक्ष दिंडी काढली. द्वादशी दिनाचे महत्व साधत बालगोपाळांची दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.शाळेच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण गावात दिंडी काढत झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश देत वृक्षारोपणासाठी वातावरण निर्मिती करण्यात आली. त्यानंतर शाळेतील आदर्श शिक्षक पुष्पांजली कापडणीस यांचा विशेष यश संपादन केल्या बद्दल निमित्त सत्कार करण्यात आला.सदरील कार्यक्र मास यशवंत अहिरे, सरपंच सरला अहिरे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विनोद अहिरे, गोविंद अहिरे, गुलाब खरे, दगा अहिरे तसेच मुख्याध्यापक सुनील निकम व सर्व सहशिक्षक उपस्थित होते.
प्राथमिक शाळेच्या वतीने वृक्ष दिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 7:18 PM
ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपारीक ड्रेस परिधान करून डोक्यावर तुळस, तसेच अनेक प्रकारातील वृक्षांची रोपे घेऊन गावातून घोषणा देत वृक्ष दिंडी काढली. द्वादशी दिनाचे महत्व साधत बालगोपाळांची दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्देब्राह्मणगाव : पावसासाठी केली विद्यार्थ्यांनी प्रार्थना