न्यायडोंगरी : येथील लोकनेते अॅड. विजय शिवराम आहेर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे वन महोत्सवानिमित्त वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते .विद्यार्थ्यांना वृक्षरोपणाचे महत्व संवर्धन, संगोपन याविषयी शिक्षकांनी माहिती दिली.या निमित्ताने सर्वप्रथम प्रभात फेरीचे अर्थात वृक्षिदंडी आयोजन करण्यात आले होते . या प्रभातफेरीच्या माध्यमातून गावातजनजागृतीपर घोषणा देण्यात आल्या. या वृक्षदंडी मध्ये इयत्ता ५ वी ते इयत्ता १२ वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. वनश्री हीच - धनश्री, झाडे लावा - झाडे जगवा, वृक्ष जगवा - जीवन फुलवा , झाड तेथे पाखरू - धरतीचे लेकरू अशा घोषणांनी गावातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.दिंडीची सांगता झाल्यानंतर विद्यालयात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष निळकंठ मोतीराम आहेर यांच्या हस्ते लोकनेते मामासाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळळ्याजवळ प्रथम वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन प्रकाश सोनेज यांनी केले तर आभार प्रदर्शन पंजाबराव आहेर यांनी केले याप्रसंगी विद्यालयाचे पदाधिकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर मोठ्या संख्येने विद्यार्थी हजर होते.
न्यायडोंगरीत आहेर हायस्कुलतर्फे वृक्ष दिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 5:45 PM