साकोरा : रविवारी (दि.९) सकाळी सहा वाजेच्या दरम्यान साकोरा नांदगाव रस्त्यावरील म्हसोबा मंदिराचे पुढील वळणावर अचानक मोठे चिंचेचे झाड कोसळल्याने दोन तास वाहतुक ठप्प झाली होती.एरवी दररोज सकाळी भाजीपाला, दुध आदीघेवून जाणाऱ्या मोटारसायकली या रस्त्यावरून यावेळी नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे.नांदगावच्या उड्डाणपुलापासून तर साकोरा गावापर्यंत रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने चार महीन्यांपूर्वी एका ठेकेदाराकडून २५ ते ३० निव्वळ निंबाच्या झाडांची कत्तल केली होती. त्यावेळी संबंधीत विभागाला रस्त्यावर आलेली अनेक चिंचाची झाडे का दिसली नाही असा सतंप्त सवाल वाहनचालकांनी यावेळी व्यक्त केला.तसेच रस्ता रूंदीकरण करणाºया ठेकेदाराने सदर रस्ता रूंदीकरणाचे काम अपूर्ण ठेवले असल्याने या रस्त्यावर असलेल्या मोरखडी बंधारा पाण्याने भरला असून, ठेकेदाराने या रस्त्यावर मोरीचे काम न केल्याने बंधाºयाच्या बाजूने सिंमेटच्या बांधकामात चारीचे बांधकाम करून मोरीतून पाणी काढून देणे गरजेचे होते, मात्र तसे न करता उलट बंधाºयाचा पोटाचा भाग पूर्ण जेसीबीने कोरल्याने सर्व पाणी रस्त्यावर येत असल्याने पुन्हा वाहनचालकांना पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.रविवार सकाळी सहा वाजेच्या दरम्यान सदर झाड रस्त्यावर आडवे पडल्याने वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे दोन्ही बाजुला वाहनांची रांग लागली होती. त्यानंतर संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून माहीती देवून जेसीबीच्या सहाय्याने रस्ता मोकळा करण्यात आला. मात्र या रस्त्याच्या रूंदीकरणाच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.
साकोरा-नांदगाव रस्त्यावर झाड कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 5:54 PM
साकोरा : रविवारी (दि.९) सकाळी सहा वाजेच्या दरम्यान साकोरा नांदगाव रस्त्यावरील म्हसोबा मंदिराचे पुढील वळणावर अचानक मोठे चिंचेचे झाड कोसळल्याने दोन तास वाहतुक ठप्प झाली होती.
ठळक मुद्देदोन तास वाहतूक ठप्प : सुदैवाने जिवीतहानी टळली