देवळा : शिवजन्मोत्सवाला प्रत्येक शाळा, विद्यालय, अंगणवाडी तसेच विविध संस्था यांच्या आवारात झाडे असावीत या उद्देशाने देवळा एज्युकेशन संस्थेच्या प्रत्येक शाखेत वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य हितेंद्र आहेर यांनी दिली.ह्यमागेल त्याला रोप' ह्या राष्ट्रीय हरित सेनेच्या योजने मार्फत आतापर्यंत संपूर्ण जिल्हाभरात शाळांमध्ये एक वड/पिंपळाचे रोप, अशी ५५०० रोपे लावण्यात आली असून मराठा विद्याप्रसारक समाजाला ५०० वडाचे रोपे व सटाणा व चांदवड महाविद्यालयात प्रत्येकी ५० वड व पिंपळ लागवड करण्यात आली असून त्यांचे योग्य संगोपन केले जात आहे. तसेच शिवजयंतीला ११००० वड, पिंपळ, जांभुळ, करंज, आवळा, सिसव, ही रोपे वाटप केली जाणार असल्याचे प्रा. आहेर व वृक्षमित्र सुनील आहेर यांनी सांगितले.यासाठी येथील राष्ट्रीय हरित सेना, श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा, महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, वनस्पतीशास्त्र विभाग, सामाजिक वनीकरण, बालविकास प्रकल्प, पंचायत समिती शिक्षण विभाग या उपक्रमाचे संयोजन करत आहे.देवळा शहर व तालुक्यात आतापर्यंत २००० पेक्षा जास्त रोपांची लागवड करण्यात आली असून, १५ ऑगस्ट २०२० पासून दररोज सलग वृक्षारोपण केले जात आहे. रोपे वाटण्याची हि प्रक्रिया यापुढे सुरूच राहणार आहे. पर्यावरणासाठी हितकारक असलेल्या भारतीय प्रजातीची वड, पिंपळ, जांभूळ, करंज, बांबू, उंबर, निंब या रोपांची लागवड केली जात आहे. यात विशेष बाब म्हणजे वृक्षारोपण सोबत संवर्धन महत्वाचे हे गृहीत धरून लावलेल्या झाडांचे फोटो वेळोवेळी एकमेकांना शेअर करण्याची योजना राबवली जात असल्याने प्रत्येक झाड जगले पाहीजे याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. तसेच प्रत्येक झाडाचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे.
शिवजयंतीनिमित्त वृक्ष लागवडीचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 6:15 PM
देवळा : शिवजन्मोत्सवाला प्रत्येक शाळा, विद्यालय, अंगणवाडी तसेच विविध संस्था यांच्या आवारात झाडे असावीत या उद्देशाने देवळा एज्युकेशन संस्थेच्या प्रत्येक शाखेत वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य हितेंद्र आहेर यांनी दिली.
ठळक मुद्देदेवळा एज्युकेशन संस्था : आजवर लावली ५५०० झाडे