ग्रामपालिकेने डोंगराच्या सौंदर्यवाढीसाठी १८०० झाडे देण्याचे ठरवले होते. त्यामधून २०० झाडे या आधी लावण्यात आली असून, पर्यावरण दिनी ३०० झाडे लावण्यात येणार आहेत. उर्वरित झाडे तीन महिन्यांच्या पावसाळ्याच्या मोसमात लावण्याचे लक्ष्य उपसरपंच रामदास भोर व धरणीमाता फाउंडेशनचे अध्यक्ष संजय देशपांडे यांनी व्यक्त केले आहे. तीन वर्षांपासून संगोपन केलेले पिंपळाचे झाड महामार्गावरील निवारा शेडजवळ रोपण केले जाणार आहे. या महोत्सवात ग्रामपालिका सरपंच सचिन गोणके, उपसरपंच रामदास भोर, ग्रामपालिका सदस्य संजय आरोटे, श्रीकांत काळे, स्वाती कडू, अरुणा जाधव, रूपाली रूपवते, हिरामण कडू, ग्रामविकास अधिकारी रवींद्र धुंदाळे, धरणीमाता फाउंडेशनचे अध्यक्ष संजय देशपांडे, उपाध्यक्ष पूनम राखेचा, विनायक शिरसाठ, तुषार बोथरा, गणेश काळे, सचिन लोढा, संजय दायमा, राजेंद्र सुराणा, परशुराम थोरात, संतोष वाघचौरे, सुधाकर हंडोरे, विजय देशमुख, संदेश मेहता आदी प्रयत्नशील आहेत. (वा.प्र.) (०४ घोटी)
===Photopath===
040621\04nsk_21_04062021_13.jpg
===Caption===
०४ घोटी