त्र्यंबकेश्वर : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या समतादूत प्रकल्पाअंतर्गत जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने संपूर्ण राज्यात ५ ते २० जून दरम्यान वृक्षारोपण पंधरवडा साजरा केला गेला.त्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील समतादूत सुजाता वाघमारे यांनी नाशिक जिल्ह्यातील शाळा तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विविध गावांत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली. यात प्रामुख्याने फळझाडे-आंबा, चिक्कू, चिंच, उंबर सीताफळ औषधी-अडुळसा तसेच जंगली वनस्पती-वड, पिंपळ, बेहडा, बावा अशा एकत्रित ६१ प्रकारच्या वनस्पतींचा सहभाग होता. वृक्षारोपणाकरिता तालुक्यातील तळेगाव, अंजनेरी आश्रम, पेगलवाडी, खंबाळे, तळवाडे, रतनपाडा, पिंप्री तसेच नाशिकच्या कोठारी कन्या शाळा आदींचा सहभाग होता.
'बार्टी'तर्फे त्र्यंबक तालुक्यात वृक्षारोपण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 11:14 PM
त्र्यंबकेश्वर : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या समतादूत प्रकल्पाअंतर्गत जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने संपूर्ण राज्यात ५ ते २० जून दरम्यान वृक्षारोपण पंधरवडा साजरा केला गेला.
ठळक मुद्दे ६१ प्रकारच्या वनस्पतींचा सहभाग होता.