पिंपळगाव बसवंत/सायखेडा : नाशिक-आग्रा,नाशिक औरंगाबाद महामार्गावरील ,चितेगाव फाटा, चांदोरी,पिंपळस ,शिंपीटाकळी,कोठूरे फाटा या परिसरातील रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक म्हणून लावलेल्या झाडांना दुष्काळाचा फटका बसला असून झाडे सुकू लागली आहे, मात्र या परिसरात गोदावरी नदीचे पात्र असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने टँकरने झाडांना पाणी देऊन झाडे जगवावी अशी मागणी प्रवाशी,स्थानिक नागरिकांनी केली आहेनाशिक ते औरंगाबाद या दोन मोठ्या शहरांना जोडणारा राज्य महामार्गचे अनेक वर्षे पूर्वी चौपदरीकरणं करण्यात आले आहे जाणारे आण ियेणारे दोन रस्त्यांच्या मध्यभागी दुभाजक तयार करण्यात आले आहे दुभाजकावर विविध प्रकारचे फुलझाडे, शोभिवंत झाडे लावली आहे, अनेक वर्षे झाल्याने झाडे वाढली आहे, अनेक फुलझाडांना रंगबेरंगी फुले येऊ लागली आहे,
महामार्गावरील झाडांनाही दुष्काळाची झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 5:41 PM