लोकमत न्यूज नेटवर्कदेवळाली कॅम्प : भगूर-पांढुर्ली पुलावर पहाटे साडेचार वाजता देवळाली कॅम्पकडे चारचाकीने प्रवास करणाऱ्या शेतकºयाचा बिबट्याने पाठलाग केल्याने शेतकºयाची गाळण उडाली. सुमारे शंभर फूट बिबट्या वाहनाच्या मागे पळत असल्याने शेतकºयाने थेट कॅम्पच्या बाजारपेठेत येऊनच सुटकेचा श्वास सोडला. बिबट्याच्या या पाठलागाच्या वृत्ताने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.भगूर, राहुरी शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दिवस-रात्र दर्शन होत असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये अगोदरपासूनच भीतीचे वातावरण असताना गेल्या दोन, तीन दिवसांपासून बिबट्या राहुरी परिसरातील शेतकºयांना अनेक ठिकाणी दिसला होता. अशातच शुक्रवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास रवी आव्हाड हे शेतकरी आपली पिकअप वाहनाने देवळाली कॅम्पकडे जात असताना दारणा नदी पुलालगत बिबट्याने अचानकपणे रस्त्यावर येऊन डरकाळी फोडून आव्हाड यांच्या वाहनाच्या मागे पाठलाग सुरू केला. बिबट्याने पाठलाग सुरू केल्याचे पाहून आव्हाड यांनी आपला वेग वाढविला व भगूरच्या दिशेने पुढे गेले. साधारणत: शंभर ते दीडशे फूट बिबट्याने पाठलाग चालविल्याने घाबरलेल्या आव्हाड यांनी थेट देवळाली कॅम्प बाजारपेठ परिसरात येऊन वाहन थांबविले व सहकारी शेतकºयांना सांगितला. बिबट्याच्या तावडीतून बचावूनदेखील गुदरलेल्या प्रसंगातून आव्हाड यांच्या अंगाचा थरकाप होत असल्याचे पाहून उपस्थित शेतकरी व व्यापाºयांनाही भीतीची जाणीव झाली. दरम्यान, पहाटे बिबट्या दिसत असल्याने शनिवारपासून सकाळी भाजीपाला बाजारपेठेत न नेण्याचा निर्णय रवी आव्हाड व इतर शेतकºयांनी घेतला आहे. राहुरी शिवारात पुलालगत वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी बाळासाहेब पानसरे, गोटीराम मोजाड, रामेश्वर मोजाड, रवी आव्हाड, मंगेश सांगळे आदी शेतकºयांनी केली आहे.अनेकांना दिसलाा बिबट्यादारणा नदीलगतचा पुलालगत रात्री उशिरा व सकाळी लवकर प्रवास करणाºयांना बिबट्या दिसलेला आहे. पुलालगत राहणाºया अनेक शेतकºयांनी बिबट्याचा डरकाळीचा आवाज ऐकू येत असल्याचे सांगितले. पुलाजवळच दोन्ही बाजूला झाडाझुडपांसह मका, उसाचे क्षेत्र आहे. वनविभागाने जवळच पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे.
बिबट्याच्या डरकाळीने थरकाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 7:47 PM
देवळाली कॅम्प : भगूर-पांढुर्ली पुलावर पहाटे साडेचार वाजता देवळाली कॅम्पकडे चारचाकीने प्रवास करणाऱ्या शेतकºयाचा बिबट्याने पाठलाग केल्याने शेतकºयाची गाळण उडाली. सुमारे शंभर फूट बिबट्या वाहनाच्या मागे पळत असल्याने शेतकºयाने थेट कॅम्पच्या बाजारपेठेत येऊनच सुटकेचा श्वास सोडला. बिबट्याच्या या पाठलागाच्या वृत्ताने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
ठळक मुद्देशेतकरी कुटुंबीय संभ्रमात । अहवालावर प्रश्नचिन्ह