नाशिक : बारावीनंतर केवळ डीएड केल्यानंतर तत्काळ शिक्षकाची नोकरी मिळण्याचा गेल्या काही वर्षांपूर्वीचा काळ होता. या काळात बीएड आणि एमएड अभ्यासक्रमाचे शिक्षण शिक्षकाची नोकरी निश्चित, असे मानले जात होते. त्यामुळे तत्कालीन परिस्थितीत अनेक प्रयत्न करून डीएड, बीएड आणि एमएड यांसारख्या शिक्षणशास्त्रातील पदविका व पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नव्हते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून ही परिस्थिती पूर्णत: बदलली असून सध्या बीएड, एमड झालेले पदवीधरही बेरोजगार असल्याने शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल ओसरला आहे. त्यामुळे राज्यात बीएडच्या उपलब्ध जागांवर प्रवेशासाठीही विद्यार्थी मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.राज्यात यावर्षी बीएडच्या जवळपास ४४ हजार जागा उपलब्ध आहेत. मात्र या जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारची स्पर्धा दिसून येत नाही. उपलब्ध ४४ हजार जागांवर प्रवेशासाठी राज्यभरातून केवळ ३७ हजार विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे परीक्षा देणाºया प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित मानला जात असला तरी राज्यभरातील विविध महाविद्यालयांमध्ये जवळपास सात हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिकमध्ये बीएडच्या जवळपास १७५० जागा उपलब्ध आहेत, तर सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अर्ज केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्यक्षात हा आकडा कमी असण्याची शक्यता असल्याने सीईटीनंतर विद्यार्थ्यांनी आपल्याच महाविद्यालयात प्रवेश घ्यावा यासाठी विविध संस्थांनी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचे आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यात एमएडच्याही उपलब्ध २ हजार ६५९ जागांपैकी काही जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे नाशिकमध्ये एमएडच्या जवळपास १०० जागा उपलब्ध असून, जिल्ह्यातून केवळ ४९ विद्यार्थ्यांनीच सीईटीसाठी अर्ज केले आहेत. उर्वरित जागांवर बाहेरील जिल्ह्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येण्याची शक्यता खूपच कमी असल्याने यापैकी ३० ते ४० टक्के जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. ८ व ९ जूनला सीईटी बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य असून, २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षासाठी यंदा आॅनलाइन सीईटी घेण्यात येणार आहे. येत्या ८ व ९ जूनला ही प्रवेश परीक्षा होणार असून, या परीक्षेसाठी नाशिकमधील दोन हजार ते एकवीसशे अर्जांसह ३७ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण एक हजार अर्जांपेक्षाही कमी आहे. दरम्यान, प्रवेश परीक्षेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे व त्या माध्यमातून महाविद्यालयांचीही विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी विविध संस्थांच्या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांसाठी सुविधा व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल घटला- बीएड़च्या जागा रिक्त राहण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 6:43 PM
बारावीनंतर केवळ डीएड केल्यानंतर तत्काळ शिक्षकाची नोकरी मिळण्याचा गेल्या काही वर्षांपूर्वीचा काळ होता. या काळात बीएड आणि एमएड अभ्यासक्रमाचे शिक्षण शिक्षकाची नोकरी निश्चित, असे मानले जात होते. त्यामुळे तत्कालीन परिस्थितीत अनेक प्रयत्न करून डीएड, बीएड आणि एमएड यांसारख्या शिक्षणशास्त्रातील पदविका व पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नव्हते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून ही परिस्थिती पूर्णत: बदलली असून सध्या बीएड, एमड झालेले पदवीधरही बेरोजगार असल्याने शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल ओसरला आहे. त्यामुळे राज्यात बीएडच्या उपलब्ध जागांवर प्रवेशासाठीही विद्यार्थी मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देबीएड एमएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल घटला राज्यातील बीएडच्या सात हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता ४४ हजार जागा उपलब्ध , केवळ ३७ हजार विद्यार्थ्यांनी केले सीईटीसाठी अर्ज