उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, आता पॅनल निर्मिती व जास्तीतजास्त मतदान कसे मिळवण्यासाठी उमेदवार सध्या नियोजन करण्यात दंग आहे.यंदाच्या ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात तरुण वर्गाने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविल्यामुळे मतदारांचे मन वळविण्यासाठी उमेदवारांला मोठी कसरत करावी लागणार आहे, कारण जुनी पिढी व नवीन पिढी हे समीकरण सध्या तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये दिसत आहे. त्यामुळे समोरील प्रतिस्पर्धीवर कशा पद्धतीने मात करता येईल, यासाठी तरुण उमेदवारांची मोर्चा बांधणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मतदार राजा नवीन उमेदवारांना की जुन्या उमेदवारांना संधी देणार, या संदर्भातील चर्चा गावागावांमध्ये रंगत आहे. निवडणूक म्हटले की, गटातटांचे राजकारण पाहायला मिळते. आपली प्रतिष्ठा पणाला लावून आपला पॅनल बहुमतात कसा निवडून येईल, यासाठी अभ्यास सुरू आहे. संपूर्ण दिंडोरी तालुक्याचे लखमापूर ग्रामपंचायत निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे. तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यंदा निवडणुकीत तीन माजी सरपंच पुन्हा नव्याने निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहे.
तीन माजी सरपंचांच्या सहभागाने तिरंगी लढत रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 9:01 PM
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील साठ गावांमध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. तालुक्यातील लखमापूर ग्रामपंचायतीत यंदा तीन माजी सरपंचाच्या लढतीने रंगत आणली आहे.
ठळक मुद्देदिंडोरी तालुक्याचे लक्ष असणारी ग्रामपंचायत निवडणूक