पळसाच्या पानाच्या द्रोणाबरोबर ग्लासमधे करवंदे टाकून मापाच्या आधारे विक्र ी करण्यात येत आहे. साधारणत: मे महिन्याच्या दुसºया आठवड्यात गरिबांचा मेवा म्हणून ओळखल्या जाणाºया करवंदाचे आगमन होते. झाडही नाही, वेलही नाही मात्र लहान मोठे झुडुप असलेल्या करवंदाच्या जाळीला कुरपुड असे म्हणतात. दºयाखोऱ्यांच्या डोंगराळ भागात आढळणाºया व उष्ण कटिबंधात येणाºया करवंदाची चव चाखण्याची आवड लहानथोरांना असतेच. दिंडोरी तालुक्यातील अहिवंत किल्ला, सुरगाणा तालुक्यातील केमचा डोंगर व कळवण तालुक्यातील रावळा जावळा डोंगराबरोबर सप्तशृंगीच्या पर्वतरांगात करवंदाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आढळते. आदिवासी बांधव करवंद विक्र ी करून संसारास हातभार लावतात. पळसाच्या पानाचे आकर्षक द्रोण तयार करून गावोगाव फिरून करवंदांची विक्र ी करतात.
आदिवासी बांधवांच्या उपजीविकेला करवंदांचा आधार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 6:18 PM