सुरगाणा : वाघबारसच्यादिवशीवाघदेवतेच्यापूजनानेआदिवासीबांधवाच्यादिवाळीलाप्रारंभझाला. लक्ष्ष्मी पुजन म्हणजे संपत्तीचे पुजन नव्हे तर गोमातेचे पूजन करण्यातआदिवासी धन्यतामानतात.बहुल तालुक्यात कोकणा, महादेव कोळी,वारली, भिल्ल या जमातीचे आदिवासी बांधव दिवाळीची सुरूवातच वाघबारशीने करतात.तालुक्यात पिंपळसोंड,बर्डीपाडा,करंजुल,खिर्डी, भाटी, अलंगुण, प्रतापगड, कुकूडणे,मांधा या गुजरात समवर्ती भागात वाघबारस पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. या गुरे चारणारे बाळदी नहमी प्रमाणे गायी चरण्यासाठी जंगलात घेऊन जातात. या दिवशी सर्व बाळदी( गुराखी ) उपवास करतात. गाव सिमेवर बारस पूजली जाते.गावातील भगता बरोबर जूनी जाणकार माणसे सिमेवर जमा होतात.गावातून शेरभर तांदूळ घरोघरी जाऊन जमा करतात.त्याला इरा असे म्हणतात. पाच कोंबडीचा बळी वाघदेवाला चढवून पूजा केली जाते. पाच वाजेच्या सुमारास सावरीचा खांब गाय दांडावर ऊभा करून त्या जागी शेणाने सारवून तांदळाच्या पुंजक्या पाडतात. आदिवासी बांधव स्वास्तिक काढत नाहीत. शेंदूर चढवून पुचा केली जाते. वाघदेवाला भगता कडू विनवणी केली जाते. या वर्षी आमच्या लक्ष्मीच ( गायीच) रक्षण तू जंगलात केलस तसेच रक्षण पुढे पण कर. अशी विनवणी वाघदेव, नागदेव, मोर, सूर्य, चंद्र यांना केली जाते. त्या ठिकाणी अंडे किंवा कोंबडीचे जिवंत पिल्लू ठेवून गाय दांडावरून ढोल वाजवून, हाकाटून गायी, गुरांचा कळप भडकावून दिला जातो. कळप सैरावैरा पळतो अन् कळपाच्या पायाखाली अंडे किवा पिलाला तुडवून बळी दिला जातो. नंतर बाळदीला अंघोळी घालून भाताचे कुटारीचा गंजीला आग लावली जाते. त्या आगीच्या ज्वाला मधून धावत पळत जावे लागते.अशी परिक्षा गुराख्याची घेतली जाते जेणे करून वाघाच्या जबडयातून,तावडीतून, जंगलात लागलेल्या आगितून,पुरातून बाळदी आपल्या गुरांची सुखरूप सुटका करण्याची पात्रता त्याच्या अंगी आहे का हे प्रत्यक्ष अनुभवातून खात्री केली जाते.त्यानंतर इरा शिजवून लहान थोर एकत्र जमवून जेवण करतात. मंतरलेले गोमूत्र तांदूळाचे दाणे घरोघरी जाऊन गोठ्यात टाकले जाते व गोठा पवित्र केला जातो. वाघदेवाच्या मुर्तीवर चंद्र,सूर्य, वाघदेव,नागदेव,मोर यांची चित्रे कोरलेली असतात.वाघदेवाला या दिवशी शेंदूर लावला जातो.शेतात पिकलेल्या नवीन धान्याची कणसे नागली, भात, उडीद, वाळूक वाहिले जाते. येथे जंगलातील रानभूत, डोंग-यादेव,निळादेव, पाणदेव, हिरवा देव, कणसरा,रानवा, गावदेवी, गाय या सर्व ज्ञात, अज्ञात देव देवता, भूत खेत या सर्वांची विधीवत पुजा केली जाते.याचा हेतू असा की आदिवासी व त्यांची गुरे वर्षेभर रानावनात,द-या खो-यात,काटाकुट्यात हिंडत असतात. त्यांना या वन्य प्राण्यांपासुन इजा होऊ नये. यात,काटाकुट्यात हिंडत असतात. त्यांना या वन्य प्राण्यांपासुन इजा होऊ नये. त्यांचे भक्ष्य ठरू नये. आदिवासींच्या लक्ष्मीला म्हणजे गायी, गुरांना इजा होऊ नये. गुरांना व गुराख्यांना सुख शांती लाभावी हाच एकमेव उद्देश या निसर्ग पुजे मागे असतो.
वाघदेवतेच्या पुजनाने आदिवासी बांधवांच्या दिवाळीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 3:57 PM
सुरगाणा : वाघबारसच्यादिवशीवाघदेवतेच्यापूजनानेआदिवासीबांधवाच्यादिवाळीलाप्रारंभझाला. लक्ष्ष्मी पुजन म्हणजे संपत्तीचे पुजन नव्हे तर गोमातेचे पूजन करण्यातआदिवासी धन्यतामानतात.बहुल तालुक्यात कोकणा, महादेव कोळी,वारली, भिल्ल या जमातीचे आदिवासी बांधव दिवाळीची सुरूवातच वाघबारशीने करतात.तालुक्यात पिंपळसोंड,बर्डीपाडा,करंजुल,खिर्डी, भाटी, अलंगुण, प्रतापगड, कुकूडणे,मांधा या गुजरात समवर्ती भागात वाघबारस पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. या गुरे चारणारे बाळदी नहमी प्रमाणे गायी चरण्यासाठी जंगलात घेऊन जातात.
ठळक मुद्दे गावोगावी वाघदेवतेची पूजा