यंदा जून महिन्यापासून शैक्षणिक वर्ष सुरू झालेले असले तरी, कोरोनाचा प्रसार वाढत असल्यामुळे अद्याप एकही शाळा सुरू करण्यात आलेली नाही. मात्र विविध ठिकाणी व्हॉट्सॲप तसेच ऑनलाइनद्वारे शिक्षकांकडून अध्यापनाचे काम करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेने डोनेट अ डिव्हाइस चळवळ सुरू केली आहे. तसेच डोनेट अ बुक उपक्रमदेखील राबविण्यात येत आहे. डोनेट अ डिव्हाइस उपक्रमांतर्गत आतापर्यंत ३८७ स्मार्टफोन, २८८ साधे फोन, ८९ टॅबलेट, ४०२ पेन ड्राइव्ह, ६५ टीव्ही, ५२ संगणक, १५ लॅपटॉप, १९१९ रेडिओ, ५ प्रोजेक्टर, २७४ स्पीकर्स, एम्प्लिफायर इ. असे एकूण ४०४१ वस्तू समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. मुंबई येथील सेजल पारीख व समीर पारीख यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ६ शाळांसाठी ३६ टॅबलेट उपलब्ध करून दिले आहेत.
आदिवासी मुलांना वाटले ३६ टॅब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 4:41 AM