त्र्यंबकेश्वर : येथील नगरपरिषदेचा कंपोस्ट खत प्रकल्प जिल्ह्यात उल्लेखनीय ठरत असून खताचे व टाकाउ कपड्याचे (चिंध्यांचे गठ्ठे) उत्पन्न देखील पालिकेला मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. पुर्वीचा कचरा डेपो नाम आता नामशेष झाला असुन आता जेमतेम एक एकर जागेतच अद्ययावत असा खत प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यासाठी साधारणपणे ३.५ व २ मीटर मापाचे बांधीव बॉक्स तयार करण्यात आले आहेत. त्यात दररोजचा ओला कचरा निवडुन बॉक्समध्ये टाकला जातो. त्यानंतर एक महिना किंवा चाळीस दिवसात दर्जेदार असे कंपोस्ट खत तयार होते. त्र्यंबकेश्वर शहरात दररोज घंटागाडीद्वारे गावातील कचरा संकलित केला जातो. घंटागाडीवरच स्पीकर लाउन दररोज कच-याचे वर्गीकरण करु नच कचरा संकलित करण्याच्या सुचना दिल्या जातात. ओला कचरा कोणता व सुक्या कच-यात कोणकोणत्या बाबींचा समावेश असतो हे सांगितले जाते. त्याबरोबरच गावातील प्लेन भिंतींवर आॅईलपेंटने सुचक व आकर्षक सुचना चित्रे रंगवुन शहरात प्रबोधन केलेले आहे. त्यामुळे महिलावर्गच दररोजचा कचरा वर्गीकरण करु नच घंटागाडीत देतात. यासाठी प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांनीच आपापल्या प्रभागातील कुटुंबांना दोनदोन डस्टबीन चिठ्ठ्या लाउन वाटप केल्या आहेत. काही लोकांनी स्वखर्चाने डस्टबीन खरेदी केलेल्या आहेत. अशा डस्टबीनवर देखील पालिकेने स्टीकर लावलेले आहेत. या स्टीकरचा घंटागाडी चालक दररोज फोटो काढतो. असे प्रबोधन केले आहे. आता नागरिकांना...विशेषत: कचरा घंटागाडीत देणा-या महिलांनाही कच-याचे वर्गीकरण करु नच कचरा दिला जातो.
त्र्यंबकचा कंपोस्ट खत प्रकल्प जिल्ह्यात उल्लेखनीय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 2:14 PM