सर्वतीर्थ टाकेद : आदिवासी समाज बांधवांच्या नेतृत्वाखाली शहापूर तालुक्यात आसनगाव येथे आदिवासी संस्कृती संवर्धन मेळावा आयोजित केला होता.दिनांक १७ नोव्हेंबर रोजी आसनगाव येथे सर्व आदिवासी समाजबांधवांच्या उपस्थितीत आदिवासी क्र ांतिकारक क्र ांतिवीर राघोजी भांगरे व धरती आबा वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून या महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्ताने शोभा यात्रा काढण्यात आली. यावेळी आदिवासी तत्वज्ञ रानकवी तुकाराम धांडे तसेच सोमनाथ कातडे व शाहीर ढवळा ढेंगळे हे प्रमुख वक्ते उपस्थित होते.आदिवासी संस्कृती, आदिवासीचे हक्क व अधिकार या विषयांवर या कार्यक्र मात मार्गदर्शन केले. शाहीर ढेंगळे यांच्या भगवान बिरसा मुंडा ‘क्रांतिकारक, तत्वज्ञ, संघटक’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. प्रसिद्ध आदिवासी गायक शरद टिपे व संदीप गवारी यांनी गीते सादर केली. अनेक ग्रुपने सादर केलेले बोहडा, तारपा नृत्य, लेझीम, मल्लखांब, पावरी नृत्य, क्र ांतीकारक वेशभूषा हे प्रमुख आकर्षण ठरले. या नृत्याने अनेकांची मने जिंकली.नाशिक, कल्याण, मुंबई, पुणे, जुन्नर, बदलापूर, अंबरनाथ, मुलुंड, वाडा, अहमदनगर, अकोले, संगमनेर, नांदेड, पालघर, जव्हार, मोखाडा, शहापूर, कसारा, खर्डी, टिटवाळा, आंबिवली, वासिंद इत्यादी ठिकाणांहून आलेल्या आदिवासी बांधव या कार्यक्र माला उपस्थित होते.आसनगाव आदिवासी बांधव व ग्रामपंचायत, पळपाडा, मुंढेवाडी, शेरेचा पाडा, शिवाजी नगर पाडा, शिवांजली नगर, गांवदेवी, संभाजी नगर, तुलसी विहार, साई नगर, आदर्श नगर यांच्या प्रयत्नातून हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
आसनगाव येथे आदिवासी संस्कृती संवर्धन मेळावा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 7:23 PM
सर्वतीर्थ टाकेद : आदिवासी समाज बांधवांच्या नेतृत्वाखाली शहापूर तालुक्यात आसनगाव येथे आदिवासी संस्कृती संवर्धन मेळावा आयोजित केला होता. दिनांक ...
ठळक मुद्देमहापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्ताने शोभा यात्रा