येवला : आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास कुणी नाकारू शकत नाही. आदिवासी बांधवांनी आपल्या मुला-मुलींच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांनी केले.येथील शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृहात आदिवासी शिक्षक ग्रुपच्या वतीने जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गायकवाड होते. प्रमुख अतिथी म्हणून तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी होते. प्रारंभी एकलव्य, भगवान बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, खाज्या नाईक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रा. जालम वळवी, वसतिगृह अधीक्षक झाल्टे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास प्रा. युवराज घनकुटे, प्रा. शरद पाडवी, निलेश नाईक, वैभव सोनवणे, राजेंद्र पिंपळे, योगेश्वर वळवी, संतोष निकम, दीपक भोये, सुभाष वाघेरे, खंडू बहिरम, एस. डी. सुडके आदी उपस्थित होते.
येवल्यात आदिवासी दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 10:01 PM
येवला : आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास कुणी नाकारू शकत नाही. आदिवासी बांधवांनी आपल्या मुला-मुलींच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांनी केले.
ठळक मुद्देजागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात आला.