येवला : येथील पंचायत समितीत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती प्रवीण गायकवाड हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य महेंद्रकुमार काले, स्त्री रोग तज्ज्ञ सुरेश कांबळे उपस्थित होते. एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाने सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले होते. प्रारंभी प्रतिमापूजन करण्यात आले.शासनमार्फत राबविण्यात येणारी एक मूठ पोषण या योजनेअंतर्गत कुपोषित लाभार्थ्यांना व जोखमीच्या गरोदर माताना लाभ देण्यात आला. तसेच बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले.जिल्हा परिषद सदस्य काले. डॉ. कांबळे, विस्तार अधिकारी बच्छाव आदींची भाषणे झाली. सूत्रसंचलन पर्यवेक्षिका वंदना शिंपी यांनी केले. आभार प्रदर्शन सुवर्णा आमले यांनी केले.कार्यक्रमास सहायक गट विकास अधिकारी अन्सार शेख, भारम ग्रामपंचायतीचे सरपंच विजय जेजुरकर, विस्तार अधिकारी भगवान बच्छाव, प्रहारचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, किरण चरमळ, रेखा गायकवाड, जिजा शिंदे, जयश्री गवळी, सरला ठोंबरे, संतोष सोनवणे, बाळू भवर, अंबादास बहिरम, रूपेश बहिरम, सुभाष बहिरम, साहेबराव मोरे, दत्तू मोरे, गोरख पवार, भीमराज बहिरम, अजित सोनवणे, सुनील सोनवणे, लक्ष्मण दळवी, छबू बहिरम आदी उपस्थित होते.
येवला पंचायत समितीत आदिवासी दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 11:29 PM
येवला : येथील पंचायत समितीत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
ठळक मुद्देबेबी केअर किटचे वाटप करण्यात आले.