रामदास शिंदे/ पेठ : नाशिक जिल्ह्यातील पेठ, त्र्यंबकेश्वर तसेच सुरगाणा तालुक्यातील आदिवासींची वनशेती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व आदिवासींचा कल्पतरू म्हणून प्रसिध्द असलेल्या मोह फुलांनी बहरला असून आदिवासी जनतेला यामूळे रोजगार मिळू लागला आहे. पेठ,त्र्यंबकेश्वर तसेच सुरगाणा तालुक्यात वनसंपतीचा मोठा ठेवा आहे. वनसंपत्ती हिच खरी मानवी जीवनाची संपत्ती असल्याचे आपण फक्त म्हणतो, मात्र जंगलाच्या संवर्धनाऐवजी या जंगलावर माणूस मात्र घालाच घालतो आहे. मानवाने कुºहाडबंदी सारख्या उपाययोजनाचे संकल्प हाती घ्यायला हवे. दिवसेदिवस वाढत्या जंगलतोडीमुळे या भागातील जंगले नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वनसंपदा ही तालुक्याची ओळख होती. वनसंपत्तीच्या ठेव्यामुळे आयातगत वाहणारे नदी , नाले डोंगर दरी आज मात्र ओसाड पडताना दिसत आहे.वनस्पती पासून मिळणार्या वन ओषधीही नामशेष होत चालल्या आहेत. वनस्पतीपासून मिळणारे डिंक, मध,फुलभाज्या,डोंगरची काळी मैना (करवंदे)व वनओषधी जेमतेम बघावयास मिळत आहेत.
मोह फुलांमुळे आदिवासींना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 3:23 PM