नाशिक : गतवर्षापेक्षा अधिक आधारभूत किंमत देऊनही यावर्षी राज्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी विकास महामंडळाच्या भरड धान्य (संकरित ज्वारी, मका, नागली ) खरेदी केंद्रांकडे पाठ फिरविली आहे. महामंडळातर्फे गतवर्षी करण्यात आलेल्या खरेदीपेक्षा यावर्षी अल्प प्रमाणात खरेदी झाली आहे. ३१ डिसेंबर २०१९ अखेर महामंडळाच्या एकूण ३६ खरेदी केंद्रांवर केवळ ६३४.५५ क्विंटल भरड धान्य खरेदी होऊ शकले आहे. (पान ७ वर ) नाशिक जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन कमी असले तरी मक्याचे चांगले उत्पादन होते. खुल्या बाजारात मका पिकाला २००० रुपये प्रतिक्विंटल दर असल्याने शेतकºयांचा खुल्या बाजाराकडे कल आहे. गतवर्षी जळगाव जिल्ह्यातील केंद्रांवर कोणत्याही प्रकारची आवक झाली नसल्याने यावर्षी जळगाव जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. धुळे आणि नाशिक जिल्ह्यात केंद्र सुरू करूनही त्यास प्रतिसाद लाभलेला नाही.
भरड धान्य खरेदी केंद्रांकडे आदिवासी शेतकऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 1:14 AM
नाशिक : गतवर्षापेक्षा अधिक आधारभूत किंमत देऊनही यावर्षी राज्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी विकास महामंडळाच्या भरड धान्य (संकरित ज्वारी, मका, नागली ) खरेदी केंद्रांकडे पाठ फिरविली आहे. महामंडळातर्फे गतवर्षी करण्यात आलेल्या खरेदीपेक्षा यावर्षी अल्प प्रमाणात खरेदी झाली आहे.
ठळक मुद्देआधारभूत किमतीत वाढ : विभागात प्रतिसाद नाही