सटाणा : तालुक्यातील आराई येथील शासकीय भूखंडावरील अतिक्रमणे हटवून तो भूखंड बेघर झालेल्या आदिवासी कुटुंबीयांना घरे बांधण्यासाठी उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी सोमवारी बेघर झालेल्या पाच आदिवासी कुटुंबीयांनी तहसील कार्यालयासमोर बिऱ्हाड आंदोलन छेडून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.याबाबत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तक्र ार केली. मात्र अधिकारी दुर्लक्ष करत असत आहेत. मागणीसाठी गेल्या महिन्यातही उपोषण केले होते. तेव्हा पंधरा दिवसांच्या आत कारवाई करतो, असे आश्वासन देऊन प्रशासनाने वेळ मारून नेली. ऐन पावसाळ्यात या कुटुंबीयांचा संसार उघड्यावर आला असून, सोमवारी या पाचही कुटुबीयांनी घरे बांधण्यासाठी शासकीय भूखंड द्यावा, या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडले. उशिरापर्यंत अधिकारी न फिरकल्याने उपोषण सुरूच होते. (वार्ताहर)
आदिवासींचे उपोषण
By admin | Published: August 09, 2016 12:13 AM