नाशिक : आदिवासी भागातील दोन पाड्यांमधील जुना वाद. या वादातून सुरू असलेली गावकºयांची हेटाळणी आणि याच पाड्यातून एक व्यक्ती डॉक्टर होते आणि त्याच्या संशोधनाचा गावातील नागरिकांना कसा फायदा होतो, याचे दृश्य सोमवारी (दि. १३) ‘पोशा’ या नाटकातून दाखविण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे सुरू असलेल्या ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेअंतर्गत आर. एम. ग्रुप यांच्यातर्फे या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. खाली पाड्यातील डॉक्टर हे अमोल या कमी बुद्धी असलेल्या मुलाच्या बुद्धीचा विकास व्हावा, यासाठी विशिष्ट प्रकारचे यंत्र बनवत असतात. सुरुवातीला गावकºयांनी हसण्यावारी नेलेल्या या संशोधनातून हे यंत्र पूर्णपणे विकसित झाल्यावर पाड्यातील मुलगा ते यंत्र परिधान केल्यावर हुशार बनतो आणि सामान्यांप्रमाणेच वर्तन करू लागतो अन् हा सर्व प्रकार पाहून दोन्ही पाड्यांवरील नागरिक अचंबित होतात आणि समाजाकडून दुर्लक्षित झालेला हा घटक काहीतरी चांगली कामगिरी करू शकतो, असा विश्वास प्रेक्षकांसमोर व्यक्त करतात. पोशा या नाटकाची निर्मिती प्रकाश साळवे यांची होती तर संगीत ध्रुवकुमार तेजाळे, सुधाकर अमृतकर, पार्श्वगायन दीपक लोखंडे, संगीत संयोजन प्रफुल्ल तेजाळे, यश पुष्कराज, गंगाधर हिरेमठ, अमित तांबे, नेपथ्य डी वसंत, मोहन ठाकरे, प्रकाश योजना विलास चव्हाण, मोहन ठाकरे, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा दीपिका मारू, तर केशभूषा स्वाती शेळके-गायकवाड यांची होती. या नाटकात मिलिंद गायकवाड, डॉ. देवराम खैरनार, पुष्पेंद्र जाधव, रवींद्र शार्दुल, देवेंद्र निकम, आकाश कंकाळ, ईश्वर सपकाळे, पी. एन. अहिरे, अनिल जडे, अमोल जाधव, स्वाती शेळके, सुनंदा ठाकरे, अलका जाधव, प्राजक्ता देशमुख, रेणुका राऊत, महिमा नाईकवाडे, सुनीता भगत, सिद्धी गुंजाळ, जितेंद्र चव्हाण, भक्ती जाधव, प्रियंका अहिरे या कलाकारांचा समावेश होता.
आदिवासी विज्ञानाचा संघर्षमय प्रवास : ‘पोशा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 1:00 AM
आदिवासी भागातील दोन पाड्यांमधील जुना वाद. या वादातून सुरू असलेली गावकºयांची हेटाळणी आणि याच पाड्यातून एक व्यक्ती डॉक्टर होते आणि त्याच्या संशोधनाचा गावातील नागरिकांना कसा फायदा होतो, याचे दृश्य सोमवारी (दि. १३) ‘पोशा’ या नाटकातून दाखविण्यात आले.
ठळक मुद्दे ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेआदिवासी भागातील दोन पाड्यांमधील जुना वाद मुलगा यंत्र परिधान केल्यावर हुशार बनतो