इगतपुरी : येथील महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या कौशल्य विकास कार्यक्रमाचे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून त्या अंतर्गत आता आदिवासी विद्यार्थी गुणवत्तेचे धडे गिरविणार आहे. यातूनच मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन महाराष्ट्र घडू शकतो. दर्जेदार काम करणाऱ्या गुणवत्तापूर्ण कामगारांचे निर्माण शक्य आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.पंतप्रधानांच्या कौशल्य विकास कार्यक्र माची सर्वप्रथम अंमलबजावणी इगतपुरीच्या महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने केली. मोठा रोजगार निर्माण होण्यासाठी फडवणीस यांच्या उपस्थितीत मुंबईला शासन, कंपनी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था इगतपुरी यांच्यात सामंजस्य करार झाला. याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्याच्या औद्योगिक धोरणात एकीकडे बदल होत असतानाच कामगार कायद्यात बदल होणे आवश्यक आहे. राज्याने कामगार क्षेत्रात नवनवे बदल स्वीकारण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे. वाढलेल्या बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यासाठी इगतपुरी महिंद्रा कंपनीचा कौशल्य विकास कार्यक्रम दूरदृष्टीने उपयुक्त ठरेल. मंत्रालयात इगतपुरीची महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनी, महाराष्ट्र शासन आणि तंत्रशिक्षण विभाग यांच्यात या विषयावर दीर्घ बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी योगेश पाटील, महिंद्रा कंपनीचे उपाध्यक्ष विजय कालरा, विजय नायर, हिरामण आहेर, इगतपुरीच्या नासीर देशमुख, नितीन देशपांडे यांच्या समवेत विविध पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)अतिदुर्गम भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणारइगतपुरीसारख्या आदिवासी दुर्गम भागातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मोठ्या प्रमाणात आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेतात. इगतपुरीच्या महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीचे तज्ज्ञ अभियंते या विद्यार्थ्यांना धडे देतील. या विद्यार्थ्यांना नवनवे तंत्र विकसित करण्यासाठी महिंद्रा कंपनीत विविध प्रात्यक्षिके करायला मिळतील. यातून गुणात्मक विद्यार्थी निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. आदिवासी भागात जि.प. शाळांना ई-प्रोजेक्टर देणे, शैक्षणिक साहित्य पुरविणे, रक्तदान, दंत चिकित्सा ,नेत्र तपासणी शिबिर, आदिवासी युवकांना तंत्रशिक्षण देणे, महिलांना शिवणकाम प्रशिक्षण, गरोदर महिलांना मार्गदर्शन,अतिदुर्गम भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे यांचा समावेश आहे.
आदिवासी विद्यार्थी गिरविणार गुणवत्तेचे धडे
By admin | Published: March 25, 2017 10:54 PM