पेठ : पेठ व हरसूल भागातील २० जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी नाशिकदर्शनाचा आनंद लुटला. सोशल नेटवर्किंग फोरम, एचपीटी महाविद्यालय व सायन्स फोरमच्या माध्यमातून आदिवासी दऱ्याखोऱ्यांतील विद्यार्थ्यांना नाशिकची सहल घडवून आणण्यात आली. रविवारी एचपीटी महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना विविध वैज्ञानिक प्रयोग व प्रतिकृती दाखविण्यात आल्या. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रावर आधारित प्रयोग सादर करण्यात आले. विज्ञान व अंधश्रद्धा यावर सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी एचपीटीचे प्राचार्य डॉ. सूर्यवंशी, सोशल नेटवर्किंग फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, डॉ. पंकज भदाणे, डॉ. उत्तम फरताळे, बाबाराव लहाने, डॉ. आशिष चौरासिया, डॉ. अनिल क्षत्रिय, रामदास शिंदे, संदीप बत्तासे, प्रा. जोशी, जयदीप गायकवाड, राहुल गाडगीळ, प्रकाश देवरे, रवींद्र खंबाईत, संदीप गिते, सुरेश जाधव, उमाकांत घुटे, संजय गवळी यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. आशिष चौरासिया यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)
आदिवासी विद्यार्थ्यांना घडविले नाशिकदर्शन
By admin | Published: January 17, 2017 10:51 PM