कळवण : सटाणा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनी कामाला गुरुवारी सुपलेदिगर येथून पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर काठरे चौफुलीवर गुरुवारी तब्बल ९ तास तळ ठोकून असलेल्या आदिवासी महिलांनी शुक्रवारी दुसऱ्या दिवशीदेखील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांच्या नेतृत्वाखाली काठरे चौफुलीवर सकाळपासून ठिय्या देत जलवाहिनीला विरोध दर्शविला.राज्य सरकार व शासकीय यंत्रणेवर विश्वास नसल्याने लोकप्रतिनिधींना पुनंद प्रकल्पातून जलवाहिनी योजना रद्द करण्यात अपयश आल्याने सटाणा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा जलवाहिनी योजनेच्या पाइप घेऊन नेणाºया गाड्या, मशिनरीचा ताफा पुनंद प्रकल्पाकडे येणार असल्याची माहिती जयदर, काठरे येथील आदिवासी महिलांना मिळाल्याने त्यांनी शुक्रवारी दुसºया दिवशीही रस्त्यावर उतरून जलवाहिनीला विरोध कायम असल्याचे दाखवून दिले आहे.सीताबाई गांगुर्डे, अनिताबाई गांगुर्डे, हिरूबाई गायकवाड, लक्ष्मीबाई चव्हाण, सोनीबाई चौधरी, बेबीबाई गांगुर्डे, जनाबाई गांगुर्डे, सुंताबाई गायकवाड, फुलाबाई महाले, पार्वताबाई पवार, आक्काबाई बर्डे, लीलाबाई महाजन, नंदाबाई बर्डे, मोहनाबाई गायकवाड, सुनीता बागुल, इंद्राबाई महाले, पार्वताबाई गावित, मंजीबाई खांडवी, पुतळाबाई भोये, लीलाबाई वाघ, झिंगूबाई पवार, विठाबाई गांगुर्डे आदी आदिवासी महिलांसह आदिवासी बांधव काठरे चौफुलीवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.आज जागतिक महिला दिन असल्याने या पार्श्वभूमीवर आंदोलक महिलांचा आंदोलनस्थळी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देवीदास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे यांनी सत्कार करून सन्मान केला.शुक्र वारी गाड्या व मशिनरी येणार असल्याची माहिती मिळाल्याने पुनंद प्रकल्प परिसरातील आदिवासी बांधव काठरे चौफुलीवर तळ ठोकून बसले आहेत. पुनंद प्रकल्पातून सटाणा शहरातील जनतेला पाणी देण्यास आमचा विरोध नाही फक्त आमचा विरोध जलवाहिनीला असल्याने जलवाहिनीचे काम थांबवावे, आदिवासी बांधवांना दमबाजी करू नये व पोलीस संरक्षण द्यावे आदी विविध मागण्या आदिवासी जनतेने व महिलांनी केल्या आहेत. जयदर, सुपलेदिगर व पुनंद प्रकल्प परिसरातील काठरेदिगर, शेरी, भैताणे, निमपाडा, जयद, सुळे, सावरपाडा, पिंपळे, चाफापाडा, दह्याणे, हुंड्यामोख, उंबरेबन, पिंपळे खुर्द, गणोरे, पाडगण, नाळीद येथील शेतकरी उपस्थित होते.सटाणा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे यांना या आदिवासी महिलांनी घेराव घालून जाब विचारत धारेवर धरले होते. शिवाय या योजनेच्या ठेकेदाराला या महिलांच्या रोषाला सामोरे जाऊन घटनास्थळावरून माघारी फिरावे लागले.१२५ पोलिसांच्या बंदोबस्तात जलवाहिनीचे काम सुरू होण्यापूर्वीच रोखण्यात यश आल्याने सुपलेदिगरकडे पाइप घेऊन जाणाºया गाड्या रस्त्यावर अडविण्यात आल्या.
दुसऱ्या दिवशीही आदिवासी महिलांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 12:50 AM
सटाणा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनी कामाला गुरुवारी सुपलेदिगर येथून पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर काठरे चौफुलीवर गुरुवारी तब्बल ९ तास तळ ठोकून असलेल्या आदिवासी महिलांनी शुक्रवारी दुसऱ्या दिवशीदेखील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांच्या नेतृत्वाखाली काठरे चौफुलीवर सकाळपासून ठिय्या देत जलवाहिनीला विरोध दर्शविला.
ठळक मुद्देसटाणा जलवाहिनी प्रकरण : महिला दिनानिमित्त चौफुलीवरच केला आंदोलक महिलांचा सन्मान